प्रशासनाच्या त्या आदेशाला सचिन काळप यांचा विरोध

0
432

कुडाळ : दि. २२ : कुडाळ शहरातील व्यक्तींशिवाय बाहेरील कोरोना बाधित व्यक्तीचे निधन झाल्यास कुडाळ शहरातील स्मशानभूमीत दहन करण्यात येऊ नये, अशी मागणी कुडाळ नगरपंचायतीचे नगरसेवक देवानंद (सचिन) काळप यांनी निवेदनाद्वारे नगरपंचायतीचे मुख्याधिकारी गाढवे यांच्याकडे केली आहे. जिल्हा प्रशासनाने याबाबत दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी करण्यास नगराध्याक्षांनी विरोध करत आपली भूमिका स्पष्ट केली होती. आता स्थानिक नगरसेवक सचिन काळप यांनी देखील प्रशासनाच्या या आदेशाला विरोध दर्शवला आहे.
काळप यांनी आपल्या निवेदनात भूमिका स्पष्ट करताना प्रशासनाने येथील लोकांची देखील काळजी घ्यावी. कोरोना बाधित मयत रुग्णासाठी स्वतंत्र स्मशानभूमीची व्यवस्था करावी. बाधित व्यक्तीला दहन केल्या नंतर वापरण्यात येणाऱ्या वस्तूंची योग्य प्रकारे विल्हेवाट लावावी. सध्याच्या स्मशानभूमीच्या बाजूला महापुरुष मंदिर असल्याने याठिकाणी भाविकांची ये-जा असते. येथील स्थानिक ग्रामस्थ गुरेढोरे चरण्यासाठी आणत असल्याने परिसरात जंतुनाशक फवारणी करुन निर्जंतुकीकरण करावे. स्मशानभूमी लगत लोकवसाहत आहे, याची योग्य खबरदारी घ्यावी. असे त्यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे. यावेळी त्यांच्या सोबत
हर्षद काळप, पप्पू धुरी, सागर काळप, कृणाल काळप आदी उपस्थित होते.