जोफ्रा आर्चरने रचला नवा विक्रम

0
1246

दुबई, दि. २३ : पहिल्या डावात चेन्नईचा वेगवान गोलंदाज लुंगी एनगिडी २० व्या षटक टाकत होता. संपूर्ण सामन्यात भेदक गोलंदाजी करणाऱ्या एनगिडीची जोफ्राने २० व्या षटकांत पीसे काढली. लुंगीच्या २० व्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर जोफ्राने षटकार लगावला. त्यानंतर दुसऱ्या चेंडूवरही जोफ्राने खणखणीत षटकार मारला. तिसऱ्या चेंडूवरही जोफ्राने षटकार वसूल केला, मात्र, पंचांनी चेंडूला नो बॉल घोषित केलं. त्यानंतर चौथ्या चेंडूवरही जोफ्राने षटकार खेचला. हा चेंडूही नो बॉल होता. त्यामुळे जोफ्राने यावेळी फक्त दोन चेंडूंत २६ धावा फटकावल्याचे पाहायला मिळाले. जोफ्रा आर्चरने तर या सामन्यात फक्त आठ चेंडूंत ४ षटकारांच्या जोरावर नाबाद २७ धावांची खेळी साकारली. जोफ्रा आर्चरच्या या २० व्या षटकातील तुफानी फटकेबाजीमुळेच राजस्थानला चेन्नईपुढे २१७ धावांचे आव्हान देता आले.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.