राज्यस्तरीय अभंग स्पर्धेत शामल मांजरेकरांचा ‘नजर’ ठरला सर्वोत्कृष्ट

0
224

सावंतवाडी, दि. २३ : शब्दनाद साहित्य समुद्रातर्फे घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय अभंग लेखन स्पर्धेत वेंगुर्ला तालुक्यातील जि. प. शाळा सुरंगपाणी येथील उपक्रमशील शिक्षिका तथा कवयित्री-लेखिका शामल शंकर मांजरेकर – पिळणकर यांच्या नजर अभंगाला सर्वोत्कृष्ट अभंग लेखनाचे पारितोषिक मिळाले आहे. कवयित्री नंदिनी सुकाळे – प्रथम, कवी प्रदीप मोरे – द्वितीय, कवयित्री राजश्री पाटील तृतीय तर कवी राज शास्त्री यांच्या अभंग रचनेला उकृष्ट अभंग म्हणून पारितोषिक मिळाले आहे. कवयित्री शामल मांजरेकर यांनी लिहिलेला नजर हा अभंग भक्तीरसापेक्षा वेगळा असल्यामुळे परीक्षकांना तो अधिक भावला असे मत समुह परीक्षक दिपाली गुरव यांनी व्यक्त केले.