सावंतवाडीच्या सुपुत्राचा आयपीएलमध्ये डंका…!

0
49192

सावंतवाडी : दि. २३ : सावंतवाडीचा सुपुत्र असलेला महाराष्ट्र संघाकडून खेळणारा निखिल नाईक यावर्षी आयपीएलच्या हंगामात कोलकाता नाइट रायडर्स संघाकडून खेळत आहे. आयपीएलमधले नाईक तडाखेबंद बॅटिंगसाठी प्रसिद्ध आहे. निखिलला इंडियन रसेल असंही म्हटलं जातं. मूळचा सावंतवाडीचा असणारा निखिल महाराष्ट्र संघाकडून खेळतो. ताकदीच्या बळावर आकर्षक फटके लगावणं त्याची खासियत आहे. किंग्ज इलेव्हनकडून खेळणारा निखिल आता कोलकाता नाईट रायडर्सच्या ताफ्यात आहे. कोलकाता नाइट रायडर्सचा पहिला सामना आज मुंबई इंडियन्स विरोधात होत असून या सामन्यात निखिल कामगिरी करतो याकडे सावंतवाडीकरांबरोबरच जिल्हावासीयांचेही लक्ष लागून आहे.

ताज्या बातम्यांसाठी आमच्या Whatsapp ग्रुपवर ऍड होण्यासाठी येथे क्लिक करा.