दीपिका ड्रग्स सेवनाची कबुली देणार?

0
607

मुंबई : दि. २४ :  सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरण आता पुरतं वाढलं आहे. या मृत्यूने बॉलिवूडमध्ये असलेलं ड्रग कनेक्शन उघड केलं आहे. अनेक मोठी नावं यात सापडू लागली आहेत. यात दीपिका पदुकोण, श्रद्धा कपूर, सारा अली खान, रकुल प्रीत सिंह यांची नावं समोर येत आहेत. पैकी रकुल प्रीत आज एनसीबीसमोर चौकशीला येणं अपेक्षित आहे. तर दीपिकाला शुक्रवार देण्यात आला आहे. तर श्रद्धा आणि सारा यांना शनिवार देण्यात आला आहे. या ड्रग कनेक्शनमध्ये सगळ्यात मोठं नाव आलं आहे ते दीपिका पदुकोणचं. मिळालेल्या माहितीनुसार सध्या दीपिका गोव्यात शूट करत आहे. एनसीबीने बजावलेलं समन्स तिला मिळालं असून शुक्रवारच्या चौकशीसाठी ती गुरुवारी गोव्यातून निघणार आहे. चौकशी दरम्यान नक्की ती काय उत्तर ते बघण आता ऑस्तुक्याचं ठरणार आहे.