राज्य युवा शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघ पुणे अध्यक्षपदी डॉ. मिलिंद जाधव

0
222

कणकवली, दि. २४ : महाराष्ट्र राज्य युवा शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघ पुणे शहर कार्यकारणी अध्यक्षपदी डॉ.मिलिंद जाधव यांची निवड करण्यात आली आहे. डॉ. मिलिंद जाधव हे कणकवली वरचीवाडी येथे राहणारे निवृत्त नायब तहसिलदार एम्. बी. जाधव यांचे सुपुत्र आणि कै. कुणाल बागवे क्रिडा मंडळाचे पदाधिकारी आहेत. डॉ.मिलिंद जाधव हे २००७ मध्ये कणकवली कॉलेजचे जनरल सेक्रेटरी होते. महाराष्ट्र राज्य युवा शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघ विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शारीरिक शिक्षण हा विषय राबवित असून ज्याप्रमाणे इतर विषयांच्या तासिका शालेय स्तरावर होतात. त्याचप्रमाणे शारीरिक शिक्षणाच्या तासिका व्हाव्यात, ऑनलाईन शिक्षण पद्धतीमध्ये शारीरिक, मानसिक व्याधीवरील उपाय म्हणुन शारीरिक शिक्षणाची असलेली गरज, काही शिक्षक विना अनुदानित शाळेमधे असुन विना पगार आहेत तसेच लॉकडाऊनमध्ये ज्या शिक्षकांना वेतन, पगार नाही मिळत त्यासाठी पाठपुरावा करणे, सर्व वंचित / युवा BPED/MPED/ Ph.D. धारकांना संघटित करणे, महाराष्ट्र शारीरिक आणि मानसिक आरोग्यमुक्त राज्य करणे, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक स्तरावर शारीरिक शिक्षण हा विषय राबवणे, क्रीडा आणि शारीरिक शिक्षण या विषयातील प्रश्न सोडवून व विकास साधणे,शासनस्तरावर शारीरिक शिक्षण व क्रीडा शिक्षकांची बाजु मांडणे व त्यांचा पाठपुरावा करणे, क्रीडा कौशल्याचा विकास करणे खेळाडूची शारीरिक व भावनिक जडणघडण ही शालेय स्तरावरचं करणे, क्रीडा शिक्षकांवर होणारा अन्याय दुर करून त्यांच्या समस्या सोडविणे अश्या प्रकारचे उपक्रम राबवित आहे. कार्यकारिणी सदस्य पुढीलप्रमाणे-सचिन भोंडवे (कार्याध्यक्ष), विजय बामुगडे (उपाध्यक्ष) , अक्षय यादव (उपाध्यक्ष), रोहित इंगवले (सचिव), अजित कंकाळ (सहसचिव ),तेजस मारणे (सहसचिव ), पपू यादव (खजिनदार) अक्षय काशीद (संघटक), मुबाशिर काझी (संघटक), सुनिल पवार (संघटक) मयूर बागे (संघटक) मझहर शेख (संघटक) ,सौरभ गावडे (प्रसिद्धी प्रमुख ), किरण पाटील (प्रसिद्धी सचिव ), निखिल सातव ,संदीप भगत, जोतीराम कौलगे, विशाल भोसले, योगेश मोहिते, अक्षय सातपुते , प्रशांत चव्हाण, अनिल उकांडे, विक्रम खानडलकर ,२५ अक्षय सालेकर( सदस्य) यांची निवड राज्य निवड समिती प्रमुख संदिप मनोरे व तायाप्पा शेंडगे यांनी केली आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.