भोसले फार्मसी कॉलेजमध्ये होणार ‘फार्मासिस्ट ऑफ द इयर’ पुरस्काराचे वितरण

0
222

सावंतवाडी, दि. २५ : जागतिक फार्मासिस्ट दिनाचे औचित्य साधून येथील यशवंतराव भोसले कॉलेज ऑफ फार्मसी येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. कॉलेजमार्फत आयोजित करण्यात येणाऱ्या या कार्यक्रमाचे यंदा सलग सहावे वर्ष असून चालूवर्षीही हा दिवस सिंधुदुर्ग जिल्हा केमिस्ट आणि असोसिएशनच्या सहकार्याने साजरा करण्यात येणार आहे. कोविड – १९ च्या प्रादुर्भावामुळे सोशल डिस्टंसिंगच्या सर्व नियमांचे पालन करुनच हा कार्यक्रम पार पडला. कोरोना साथीच्या कालावधीत फार्मासिस्ट व्यावसायिकांचे योगदान फार मोठे आहे. त्यामुळे याविषयीची कृतज्ञता म्हणून उपस्थित सर्व फार्मासिस्ट व्यावसायिकांचा सत्कार याप्रसंगी करण्यात येईल. जिल्ह्यातील फार्मसी क्षेत्रात भरीव योगदान दिलेल्या व्यक्तिमत्त्वाचा दरवर्षी ‘फार्मसिस्ट ऑफ द इयर’ पुरस्कार देऊन कॉलेजतर्फे गौरव केला जातो. यावर्षी शिरोडा येथील फार्मासिस्ट आणि व्यावसायिक कमरुद्दिन शेख यांचा हा पुरस्कार देऊन गौरव करण्यात येईल. संस्थेचे अध्यक्ष अच्युत सावंतभोसले आणि जिल्हा केमिस्ट व ड्रगिस्ट असोसिएशनचे पदाधिकारी यांच्या उपस्थितीत हा सन्मान करण्यात येईल. कार्यक्रमाला सर्व विद्यार्थी झूम व युट्युब सारख्या ऑनलाईन माध्यमांद्वारे उपस्थित राहतील. फार्मसी क्षेत्राविषयी माहिती देणाऱ्या विविध ई-मॅक्झिन्स, ई-ब्रोशर्स व न्यूज लेटर यांचे डिजिटल उदघाटन यावेळी करण्यात येईल. दुपारच्या सत्रात विद्यार्थी व शिक्षक वर्गासाठी परदेशी शिक्षणाच्या संधी या विषयावर इंटरनॅशनल वेबिनारचे आयोजन करण्यात आले आहे. हे सर्वांसाठी मोफत असून यामध्ये तज्ञ मार्गदर्शक म्हणून कॅनडा येथील नोव्हा स्कॉशिया कंपनीचे व्यवस्थापक अक्षय पाटील सहभागी होतील. या कार्यक्रमाला सर्व विद्यार्थी व फार्मासिस्टनी वर्गाने ऑनलाइन माध्यमांद्वारे उपस्थित रहावे असे आवाहन प्राचार्य डॉ. विजय जगताप आणि जिल्हा केमिस्ट ड्रगिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष आनंद रासम यांनी केले आहे.

ताज्या बातम्यांसाठी आमच्या Whatsapp ग्रुपवर ऍड होण्यासाठी येथे क्लिक करा.