संजू विर्नोडकर टिमतर्फे बँक ऑफ इंडियाच्या शाखा सॅनिटाईज

0
323

सिंधुदुर्ग : दि २५ : बँक ऑफ इंडियाच्या शाखांमध्ये कर्मचारी व अधिकारी यांना कोरोना संक्रमणाची बाधा झाली. ज्या ब्रॅंचमध्ये कोरोना बाधित आढळले त्या ठिकाणच्या ब्रँच बंद ठेवल्या. दरम्यान, सामाजिक कार्यकर्ते संजू विरनोडकर टिंमच्या सहकार्याने  बँकेच्या शाखा सॅनिटाईज केली. ब्रँचमध्ये चौविस तासाच्या आत कोरोना प्रतिबंधक फवारणी करुन बॅक आँफ ईडीया क्षेत्रीय कार्यालय, कुडाळ यानी ग्राहकांच्या व कर्मचार्‍यांच्या आरोग्याच्या हितासाठी दक्षता घेतली.  कणकवली ब्रँच, कुडाळ ब्रँच, पाट ब्रँच, दोडामार्ग ब्रँच येथिल बॅक ऑफ इंडियाच्या शाखांमध्ये व ATM मध्ये निर्जंतुकीकरण  करण्यात आले आहे. अचानक बँका बंद ठेवल्याने अनेक नागरिकांची गैरसोय झाली पण संपुर्ण बँकेत  निर्जतुकीकरणाची प्रक्रिया पाहुन नागरीकानीही समाधान व्यक्त केले. बँक ऑफ इंडियाचे क्षेत्रीय कार्यालयाचे अधिकारी नंदकिशोर प्रभुदेसाई यानी जातीनीशी प्रत्येक शाखेची दखल घेवून संजू विरनोडकर टिंमच्या सहकार्याने  बँकेच्या शाखा सॅनिटाईज करून घेतल्या. त्यांच्या या त्वरित सहकार्याबद्दल त्यानी समाधान व्यक्त केले आहे.   

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.