एन.एस.यु.आयतर्फे ‘ विद्यार्थी दरबार’

0
283

सिंधुदुर्ग : कोरोनाच्या संकट समयी विद्यार्थ्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. या समयी विद्यार्थींची प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. या बिकट समयी अनेक अडचणी प्रवेश घेताना होत आहे. त्यामुळे पालक व विद्यार्थी हवालदिल झाले आहेत. म्हणून विद्यार्थी यांच्या समस्या जाणण्यासाठीत्याचे निवारण करण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष व राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, एन.एस.यु.आय. चे राष्ट्रीय अध्यक्ष निरज कुंदन, महाराष्ट्र प्रभारी अमितकुमार टिमा , महाराष्ट्र राज्य एन.एस.यु.आय.चे. अध्यक्ष अमिर शेख यांच्या मार्गदर्शनाखालीविद्यार्थी दरबाराचे’ आयोजन उद्या बुधवार रोजी स. 11 ते ३ सावंतवाडी काँग्रेस कार्यालय येथे आयोजन केले आहे . कोणत्याही विद्यार्थ्यांला काही समस्या असल्यास विद्यार्थी दरबारात भेट घेण्याचे आवाहन सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्ष कौस्तुभ गावडे यांनी केले.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.