एस.एन.क्रिएशनतर्फे ऑनलाईन ‘फॅन्सी ड्रेस कॉम्पीटीशन’

0
155

सावंतवाडी : एस. एन. क्रिएशन खास बालकलाकारांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी ऑनलाईन फॅन्सी ड्रेस कॉम्पीटीशन घेऊन आली आहे. स्पर्धेची नावनोंदणी १० ऑक्टोबर २०२० पर्यत करता येणार आहेत. १२ ऑक्टोबर नंतर कोणत्याही सहभागी स्पर्धकाचे व्हिडीओ स्वीकारले जाणार नाहीत. याची प्रवेश फी 100/- रु असून  गुगल पे नं. 7744998180 अथवा फोन पे करावी. स्पर्धा दोन वयोगटात होणार असून 2 वर्ष – 7 वर्ष हा पहिला तर 8 वर्ष – 15 वर्षहा दुसरा गट असणार आहे.  स्पर्धेत सहभागी होण्यासाठी 9404360339 या व्हाट्सअप नंबरवर स्पर्धकांनी आपली नाव नोंदणी करावी व प्रवेश फी भरल्याचा स्क्रीनशाॅट पाठवावा (नाव ,पत्ता, मोबाईल ,पेमेंट स्क्रीनशॉट). नावनोंदणी केलेल्या सर्व स्पर्धकांना व्हाट्सअप ग्रुपमध्ये ऍड केले जाईल व पुढील योग्य त्या सूचना दिल्या जातील. दोन्ही गटांसाठी प्रथम क्रमांक १०००, द्वितीय क्रमांक ५००, तृतीय क्रमांक ३००, उत्तेजनार्थ १ – १००, उत्तेजनार्थ २ – १००,  बेस्ट डायलॉग २००, बेस्ट ड्रेपरी २००, Viewers choice १०० रुपयांची पारितोषिके दोन्ही गटांना दिली जाणार आहे. यात सहभाग घेण्यासाठी  डायलॉगसाठी भाषेची अट नाही, व्हिडिओ कमीत कमी 30 सेकंद व जास्तीत जास्त 3 मिनिटाचा असावा, व्हिडिओ पाठवताना स्पर्धकाचे संपूर्ण नाव, 
व्हिडिओ बनवतानाची तारीख, वय, राहण्याचे ठिकाण नमूद कराव. स्पर्धकाने व्हिडिओच्या सुरवातीला आपले नाव ,पत्ता व वय सांगणे अनिवार्य आहे. स्पर्धेचा निकाल परीक्षकांच्या गुणांनुसार असेल , परीक्षकांचा निर्णय अंतिम या नियम व अटी राहतील. स्पर्धेचा निकाल सप्टेंबरनंतर काही दिवसातच जाहीर केला जाईल पारितोषिक रक्कम व प्रशस्तीपत्रक ऑनलाइन पाठवले जाईल.सर्व सहभागी बालकलाकारांना ऑनलाइन प्रशस्तीपत्रक प्रदान करण्यात येईल. नियम व अटी यामध्ये गरज असल्यास फेरबदल करण्याचा पूर्ण अधिकार आयोजकांकडे राहील. सर्व सहभागी बालकलाकारांचे व्हिडिओज s.n.creations च्या official यूट्यूब चैनल वर अपलोड केले जातील. https://www.youtube.com/channel/UC3cztRq7KEiZAlu1AO3CBwgतरी या स्पर्धेत जास्तीत जास्त स्पर्धकांनी सहभाग घ्यावा अस आवाहन आयोजकांनी केलय.