पणदूरमध्ये चोऱ्यांचे सत्र सुरूच…!

0
595

कुडाळ, दि. ५ : मुंबई – गोवा महामार्गावरील पणदूर तिठा येथे रविवारी रात्री अज्ञात चोरट्यांनी ३ टि स्टाँल फोडून त्यातील रोख रक्कमेसह काही वस्तू लंपास केले. चोरट्यांच्या या चोरीच्या सत्रामध्ये पोलिसांसमोर या चोरट्यांनी आव्हान उभे केले आहे. पणदूरतिठा येथील दादा कदम यांच्या शुभंकरोती वडापाव सेंटर, संदीप साईल यांच्या सातेरीच्या छायेत, दत्तकृपा टि स्टाँल या तिन्ही दुकाने चोरट्यांनी कटरने लॉक तोडून फोडली. दादा कदम ५००/,सातेरीच्या छायेत ८००/ व वस्तू लंपास करण्यात आल्या. यापूर्वी असेच थैमान घातले होते. त्यावेळी तत्कालीन पोलीस अधीक्षक दीक्षितकुमार गेडाम यांच्या नेतृत्वाखाली पोलीसांनी या चोरट्यांच्या मुसक्या आवळल्या होत्या. आता पुन्हा एकदा या चोरट्यांनी डोके वर काढले आहे. त्यामुळे पोलिसांसमोर आव्हान उभे केले आहे. नवनिर्वाचित पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे कशी कारवाई करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.