फीव्हर आयपीएलचा ; #MyIplStar गेम #Sindhudurglive चा 

0
603

सिंधुदुर्ग : दि ०७ : आजपासून आयपीएल संपेपर्यंत कोकणचं महाचॅनेल सिंधुदुर्ग लाईव्ह एक खास गेम #MyIplStar खास क्रिकेट लव्हर्ससाठी घेऊन आलंय. या गेममध्ये आम्ही आयपीएल संदर्भात विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे द्या आणि सिंधुदुर्ग लाईव्हकडून आकर्षक बक्षिसे जिंकायची संधी मिळवा. या गेममध्ये सहभागी होऊन आपल्या आवडत्या आयपीएल संघाला आणि खेळाडूला सपोर्ट करता येणार आहे. तर सिंधुदुर्ग लाईव्हकडून आकर्षक बक्षिसे जिंकायची संधीही यानिमित्त मिळणार आहे. एवढच नव्हे तर तुमच्या आवडत्या क्रिकेट स्टार विषयी काय वाटतं ? ते सिंधुदुर्ग लाईव्हच्या सोशल मिडीया अकाउंट्सवर #MyIplStar आणि #Sindhudurglive हे हॅशटॅग वापरुन व्हिडीओ किंवा फोटोच्या माध्यमातून पोस्ट करता येणार आहे. दर्जेदार पोस्ट करुन या गेममध्ये सहभागी होणाऱ्यांना आकर्षक बक्षिसं जिंकायची संधी मिळणार आहे. त्यामुळे सिंधुदुर्ग लाईव्हच्या या अनोख्या गेममध्ये सहभागी व्हा आणि आपल्या आवडत्या क्रिकेट स्टारविषयी आपले प्रेम व्यक्त करा असं आवाहन टीम सिंधुदुर्ग लाईव्हन केलय.