‘त्या’ पीडितेचा मृत्यू आई आणि भावाच्या मारहाणीमुळे ; आरोपींचा गजब दावा

0
1013

उत्तर प्रदेश, दि. ०८ : हाथरस प्रकरणातील पीडितेचा मृत्यू आई आणि भावाच्या मारहाणीमुळे झाल्याचा गजब दावा आरोपींनी केलाय. त्या चारही आरोपींनी जेलमधून उत्तर प्रदेश पोलिसांना पत्र लिहलं असून त्या पत्रात आपण निर्दोष असल्याचं सांगितलं आहे. पत्रात आरोपींनी नमूद केलं आहे की, या आरोपींची पीडितेसोबत मैत्री होती. त्यांचं एकमेकांसोबत बोलणंही होत असे. परंतु, पीडितेला मारहाण आरोपींनी केलेली नाही. तर पीडितेची आई आणि भावाने केलेली आहे. या मारहाणीनंतरच पीडितेचा मृत्यू झाला. पत्रात चारही आरोपी संदीप, रामू, रवी आणि लवकुश यांच्या सह्या आणि अंगठ्याचे ठसेही आहेत. आरोपींनी पत्रात लिहिलं आहे की, त्यांची पीडितेसोबत मैत्री होती. फोनवरही बोलणं होत असे. याच कारणामुळे त्या दिवशी आई आणि भावाने पीडितेला मारहाण केली होती. त्यानंतर आरोपी घटनास्थळी पोहोचले. त्यांनी पीडितेला पाणीही पाजलं होतं. परंतु, उलट त्यांनाच या प्रकरणात अडकवण्यात आलं. तसेच असं पत्र लिहून आरोपींनी उत्तर प्रदेश पोलिसांकडे निष्पक्ष चौकशीची मागणी केली आहे.