वापरलेली पीपीई किट्स उघड्यावर फेकून देण्याचा सिलसिला सुरूच

0
325

कणकवली, दि. ०९ : कणकवलीत वापरलेली पीपीई किट्स उघड्यावर फेकून देण्याचा सिलसिला सुरूच असून हरकुळ पाठोपाठ आता खुद्द कणकवली शहरात नरडवे रोडवर ड्रीम होम शो रूम समोर पीपीई किट्स आढळून आली आहेत. गुरुवारी रात्री कणकवली शहरातील ड्रीम होमसमोर रस्त्यालगत फेकून दिलेली पीपीई किट्स आढळून आली. याबाबत नगराध्यक्ष समीर नलावडे याना समजताच नलावडे यांनी तात्काळ नगरपंचायत चे कर्मचारी पाठवून त्या पीपीई किट्सची रीतसर विल्हेवाट लावली. कोरोना संसर्ग फैलावणाऱ्या आणि सामाजिक आरोग्याला धोकादायक असे कृत्य करणाऱ्या या विकृत मनोवृत्तीचा नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी तीव्र शब्दांत निषेध केला असून या विकृतांचा शोध घेऊन तात्काळ गुन्हे दाखल करण्याची मगणी केली आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.