ऑनलाईन कार्यक्रमातून गरजूंना मदतीचे आवाहन

0
135

कणकवली, दि. ०९ : लॉकडाऊन काळात कोरोनामुळे अनेकांची आर्थिक घडी विस्कटली असून अनेकजण बेकार झाले आहेत. अशा कलाकारांना आणि शालेय विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी सिंधुकन्या, गायिका आणि सुत्रसंचालक प्रणाली कदम व दिग्गज सेक्सोफोनिस्ट प्रभाकर साटम यांनी विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. अंजली आर्टस प्रस्तुत सेक्सोफोन मेलोडी हा कार्यक्रम शनिवारी युटुबवर ऑनलाईन प्रदर्शित होणार आहे. हा कार्यक्रम पाहण्याचे आणि आर्थिक मदत करण्याचे आवाहन प्रणाली कदम आणि प्रभाकर साटम यांनी केले आहे. गेल्या सहा महिन्याच्या काळात अनेक कलकारांवर उपासमारीची वेळ आली आहे. तर ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शालेय शिक्षण घेताना अनेक आडचणी निर्माण झाल्या आहेत. अशा सिंधुदुर्गातील कलावंतांना आर्थिक मदत मिळावी या हेतूने या कार्यक्रमाची निर्मिती केली असून यामधून अनेकांना आर्थिक हातभार देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. प्रभाकर साटम हे मुंबईतील नावाजलेले नाव असून सध्या ते कसाल येथे वास्तव्यास आहेत. तर जिल्ह्यातील कणकवली येथील प्रणाली कदम हि कलाक्षेत्रात कार्यरत असून स्वत:चा आवाज तिने देश विदेशात पोहोचवला आहे. लॉकडाऊनचे सर्व नियमांचे पालन करुन १० ऑक्टोबरला सायं. ७ वा.(Pranali kadam- https://youtu.be/pVl2YArmwgo )युट्युबवर हा कार्यक्रम प्रक्षेपित होईल. यानिमित्ताने मदत करायची असल्यास प्रणाली कदम 7588455307 किंवा प्रभाकर साटम 9420164749 यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.