‘त्या’ परीक्षेची केंद्र जिल्ह्यातच ; सिंधुदुर्ग लाईव्हच्या पाठपुराव्याला यश

0
455

सिंधुदुर्ग : दि १० : एम एच टी सी इ टी २०२० ह्या परीक्षेसाठी रत्नागिरी जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना कोल्हापूर (२४१ विद्यार्थी ) आणि पुणे (२३३ विद्यार्थी ) तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील विद्यार्थ्याना कोल्हापूर (१७७ विद्यार्थी) येथे परीक्षा केंद्राचे वाटप पीसीएम ह्या गटाच्या परीक्षेकरिता करण्यात आलेले होते. विद्यार्थ्याच्या विनंतीनुसार तसेच उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या आदेशानुसार विद्यार्थ्याची परीक्षाकेंद्रे बदलून रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्येच देण्यात आलेली आहेत. विद्यार्थ्यांना देण्यात आलेले जुने हॉल तिकीट हे रद्दबातल करण्यात आलेले आहे. नवीन हॉल तिकीट विद्यार्थ्यानी mhtcet2020.mahaonline.gov.in ह्या संकेत स्थळावर लॉग इन करून प्राप्त करून घ्यावे. तर बदलण्यात आलेल्या परीक्षाकेंद्रांबाबाबतची माहिती एस एम एस आणि ईमेलद्वारे संबंधित विद्यार्थ्याला महाऑनलाईन संस्थेमार्फत पाठविण्यात येईल. तर विद्यार्थ्याना काही माहिती अथवा तक्रार असल्यास maharashtra.cetcell@gmail.com ह्या ईमेल वर संपर्क करावा अस आवाहन करण्यात आलय. या विद्यार्थी वर्गाला सिंधुदुर्ग जिल्हातच परीक्षची सोय करण्याचे शिवसेनेचे जोरदार प्रयत्न सुरु होते. मंत्री उदय सामंत, खासदार विनायक राऊत, आमदार दीपक केसरकर यांच्या नेतृत्वाखाली अखेर याला यश आल. या निर्णयाकडे सिंधुदुर्ग जिल्हातील अवघ्या विद्यार्थी व पालकांचे लक्ष लागून होत तर सिंधुदुर्ग लाईव्हने याचा जोरदार पाठपुरावा केला होता. याला अखेर यश आल.

ताज्या बातम्यांसाठी आमच्या Whatsapp ग्रुपवर ऍड होण्यासाठी येथे क्लिक करा.