जाणून घ्या #SindhudurgLiveच्या #MyIplStar गेममध्ये भाग घेणाऱ्या युजर्सना मिळणारी बक्षिसे

0
497

सिंधुदुर्ग, दि. १४ : फीव्हर आयपीएलचा #MyIplStar गेम #sindhudurglive चा, भाग घ्या आणि जिंका आकर्षक बक्षिसे. जगातील सर्वात मोठी टी-२० लीग समजली जाणारी इंडियन प्रीमिअर लीग (IPL-2013) संपेपर्यंत #LPsportsvengurla आयोजित आणि कोकणचं महाचॅनेल #sindhudurglive प्रस्तुत खास ऑनलाईन प्रश्नमंजुषा स्पर्धा #MyIplStar क्रिकेट लव्हर्ससाठी घेऊन आलंय. या गेममध्ये आम्ही आयपीएल संपेपर्यंत आयपीएल संदर्भात रोज २ प्रश्न विचारणार आहोत. विचारलेल्या प्रश्नांची अचूक उत्तरे देणाऱ्यांना सिंधुदुर्ग लाईव्हकडून आकर्षक बक्षिसे जिंकायची संधी मिळणार आहे. या अनोख्या गेममध्ये सहभागी व्हा आणि आपल्या आवडत्या क्रिकेट स्टारविषयी आपले प्रेम व्यक्त करा असं आवाहन टीम सिंधुदुर्ग लाईव्हनं केलंय.

जाणून घ्या, काय आहे ही स्पर्धा आणि कसा घ्याल #MyIplStar स्पर्धेत भाग ?

१ –सिंधुदुर्ग लाईव्हकडून रोज २ प्रश्न पोस्टच्या स्वरुपात विचारले जातील
२ – दोन्ही प्रश्न हा सिंधुदुर्ग लाईव्हच्या फेसबुक पेजवर विचारले जातील
३ –फेसबुकवरील प्रश्नाचे उत्तर तुम्ही थेट पोस्टखाली कमेंट करुन द्यायची आहेत
४ –सिंधुदुर्ग लाईव्हकडून विचारलेल्या प्रश्नांच्या पोस्टखालील तुमची कमेंट ही दर्जेदार आणि माहितीपूर्ण असावी
५ –सर्व प्रश्नांची नियमीत आणि अचूक उत्तरे देणाऱ्या पहिल्या १८ युजर्सना सिंधुदुर्ग लाईव्हकडून आकर्षक बक्षिसे देण्यात येतील
६ – स्पर्धेतील विजेत्यांचा बक्षिस वितरण कार्यक्रम सिंधुदुर्ग लाईव्हचं प्रधान कार्यालय, सावंतवाडी येथे आयपीएलच्या अंतिम सामन्या दिवशी होईल.

टीप – या स्पर्धेसंबंधी सर्व हक्क सिंधुदुर्ग लाईव्हकडे राहतील. या स्पर्धेसंबंधात अधिक माहितीसाठी तुम्ही 8208525709 या क्रमांकावर संपर्क साधू शकता.

#sindhudurglive च्या #MyIplStar गेममधील पहिल्या १८ विजेत्यांना मिळणार ही आकर्षक बक्षिसे
पहिलं बक्षिस – बॅट
दुसरं बक्षिस – स्टंप
तिसर बक्षिस – ६ चेंडू
या व्यतिरीक्त १५ उत्तेजनार्थ युजर्सना बक्षिस म्हणून आकर्षक जर्सी देण्यात येणार आहेत