एडगाव नळपाणी योजनेच काम ठेकेदारांवर कारवाई करा ; ग्रामस्थांची मागणी

0
462

वैभववाडी, दि. १४ : तालुक्यातील एडगाव पवारवाडी येथील रखडलेल्या नळपाणी योजनेच्या कामासंबधी संबंधित ठेकेदारावर कारवाई करावी अशी मागणी ग्रामस्थांनी ग्रामीण पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांकडे केली आहे.
एडगाव पवारवाडी येथील राष्ट्रीय पेयजल योजनेतून सन २०१३ -१४ साली मंजुरी झालेले नळपाणी योजनेच काम रखडले आहे.या योजनेकरिता २४ लाख ४६ हजार ३०० रुपये इतका निधी मंजूर झाला आहे. मात्र गेली सहा वर्षे हे काम रेंगाळल आहे.यासंदर्भात आ.नितेश राणे यांनी विधानसभेत तारांकित प्रश्न उपस्थित केला. तसेच प.स.सदस्य मंगेश लोके यांनीही पंचायत समितीच्या सभागृहात हा विषय वेळोवेळी मांडला. मात्र ग्रामीण विभागाकडून याकडे दुर्लक्ष केले जा होते. अखेर ग्रामस्थांनी दोन दिवसांपूर्वी पालकमंत्री यांच्या जनता दरबारात हा प्रश्न उपस्थिती केला. यानंतर गावात ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे अधिकारी मंगळवारी दाखल झाले. त्या अधिका-यांना ग्रामस्थांनी धारेवर धरले. कंत्राटदाराच्या हलगर्जीपणामुळे योजनेस विलंब झाला आहे. संबंधित ठेकेदाराने आठ दिवसांत कामाला सुरुवात न केल्यास फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. दोन दिवसांत यावर मार्ग काढू अस आश्वासन अधिकारी श्री वळंजू यांनी ग्रामस्थांना दिले. या सभेला न.पा.पु.चे सचिव बळीराम रावराणे, दत्ताराम रावराणे, सुनील रावराणे, राजू पवार, सचिन रावराणे, बच्चाराम रावराणे, योगेश पवार, शंकर रावराणे, सुधीर रावराणे, ग्रामसेवक श्री राठोड आदी उपस्थित होते.

ताज्या बातम्यांसाठी आमच्या Whatsapp ग्रुपवर ऍड होण्यासाठी येथे क्लिक करा.