शिक्षकीपेशा पलीकडच्या चंद्रकांत सावंतांच्या कार्याचा सन्मान

0
235

वेंगुर्ला, दि. १७ : जगातील आदर्श शिक्षक पुरस्कार, राज्यस्तरीय शिक्षक रत्न पुरस्कारासाहित विविध स्तरावरील पुरस्कार प्राप्त आंबोली गावठणवाडी येथील रहिवासी तथा जि. प. पूर्ण प्राथमिक शाळा मठ नं. २ ता. वेंगुर्ला येथील पदवीधर शिक्षक चंद्रकांत सावंत यांनी आतापर्यंत सावित्रीबाई फुले दत्तक पालक योजनेअंतर्गत शालेय विद्यार्थीनींसाठी शैक्षणिक सहकार्याच्या भावनेने एकूण ८७ विद्यार्थिनी दत्तक घेतल्या आहेत. या त्यांच्या कार्याबद्दल शिक्षण क्षेत्रातुन त्यांचा सन्मान करण्यात आला. शिक्षक चंद्रकांत सावंत यांनी मागील आठवड्यात एकूण ७ विद्यार्थिनी दत्तक घेतल्या आहेत यात जि प प्राथमिक शाळा तेंडोली शाळेतील १ विद्यार्थिनी, जि प प्राथमिक शाळा वेंगुर्ला वडखोल येथील १ विद्यार्थिनी, आंबोली जि प प्राथमिक शाळा बाजारवाडी, जकातवाडी व कामतवाडी येथील प्रत्येकी १ विद्यार्थिनी तर आंबोली नांगरतास येथील २ विद्यार्थिनी यांचा समावेश असून या ७ विद्यार्थिनीचे प्रत्येकी ३ हजार प्रमाणे एकूण २१ हजार रुपये संबंधित शाळा व्यवस्थापन समितीकडे त्यांनी सुपूर्द केले. या त्यांच्या कार्याबद्दल प्राथमिक शाळा तेंडोली गावठण शाळेच्या वतीने श्रीे. सावंत सर यांचा तेंडोली ग्रा प सदस्य गुरुनाथ अच्युत मेस्त्री याच्या हस्ते शाल, श्रीफळ व पुष्प देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी मुख्याध्यापिका ऋ‌तुजा साळगावकर, सहशिक्षक रमाकांत गोसावी, पालक अनिल चव्हाण, अनिल साळगावकर आदी उपस्थित होते. तर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, वेंगुर्ला- वडखोल यांच्यावतीने सावंत सर यांचा शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष मनोहर पालव, मुख्याध्यापक उमेश वजराटकर याच्या हस्ते शाल, श्रीफळ व गुलाबपुष्प व आभारपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. जि.प. केंद्र शाळा आंबोली नं. १ शाळेच्या वतीने केंद्राचे केंद्रप्रमुख आर.बी. गावडे, शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष श्रेया परब, मुख्याध्यापिका सुजाता आडाव, उपशिक्षक विजय शिंदे यांच्या उपस्थितीत शाल, श्रीफळ व पुष्प देऊन अभिनंदनपर सन्मान करण्यात आला. तसेच जि.प. प्राथमिक शाळा आंबोली कामतवाडी यांच्यावतीने प्रभारी गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती सावंतवाडी दुर्वा साळगांवकर यांच्या हस्ते व आंबोली – चौकुळ केंद्राचे केंद्रप्रमुख आर.बी. गावडे, ग्रा प सदस्य मानसी कैलास गावडे, बबन वसंत गावडे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष कार्तिकी काशिराम गावडे, शाळेचे मुख्याध्यापक मधू कोले, उपशिक्षिका अनिता साबळे, अनंत राऊत, काशीराम राऊत, पत्रकार निर्णय राऊत यांच्या उपस्थितीत शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन अभिनंदनपर सन्मान करण्यात आला.

ताज्या बातम्यांसाठी आमच्या Whatsapp ग्रुपवर ऍड होण्यासाठी येथे क्लिक करा.