स्थायी समितीत खडाजंगी ; काय आहे कारण ?

0
144

कुडाळ :नेरूर देऊळवाडा ता.कुडाळ सरपंच यांनी एका घराला परवानगी दिली नाही. ही परवानगी नाकारून सरपंचाने आपल्या कर्तव्यात कसूर केला आहे. त्यांना कलम 39 अन्वये सरपंच पदावरून बडतर्फ करावे. अशी लेखी तक्रार सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेकडे येथील रहिवासी तसेच माजी ग्रामपंचायत सदस्य रुपेश पावसकर यानी जिल्हा परिषदेकडे केली होती. या अनुषंगाने स्थायी समितीमध्ये संजय पडते याने हा विषय आल्याने याला तीव्र विरोध केला. जिल्हा परिषदेकडे आलेली प्रत्येक तक्रार तुम्ही स्थायी समितीमध्ये आणू शकता का?आणि असं होत असेल तर ते योग्य नाही. असा दावा पडते यांनी केला. मात्र पावसकर यांच्या या तक्रारीचा धागा पकडून नेरूर ग्रामपंचायत सरपंच यांच्या कारवाईचा मुद्दा स्थायी समितीमध्ये चांगलाच गाजला.