खा. नारायण राणेंच्या हस्ते गार्डन आणि स्पोर्ट्स क्लब कॉम्प्लेक्सचे भूमिपूजन…!

0
830

कणकवली : माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे यांच्याहस्ते कणकवली न. पं. च्या गार्डन आणि स्पोर्ट्स क्लब कॉम्प्लेक्सचे झाले भूमिपूजन // निलमताई राणे, आमदार नितेश राणे, भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली, नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले भूमिपूजन // भालचंद्र महाराज मठाशेजारी कांबळी गल्ली येथे शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी गार्डन आणि स्पोर्ट्स क्लबचे कणकवलीवासीयांचे स्वप्न आता लवकरच होणार साकार // एकूण ७४ गुंठे क्षेत्रात साकारतोय गार्डन आणि स्पोर्ट्स क्लबचा भव्य प्रकल्प // एकूण १५ कोटींच्या प्रकल्पापैकी साडेचार कोटींच्या फेज वन प्रकल्पाचे आज झाले भूमिपूजन // साडे अकरा गुंठे क्षेत्रात रमणीय गार्डन तर साडे बासष्ट गुंठे क्षेत्रात उभे राहणार स्पोर्ट्स क्लब कॉम्प्लेक्स // कणकवली शहराच्या पर्यटनाचा हे गार्डन आणि स्पोर्ट्स क्लब ठरणार मानबिंदू // गटनेता तथा बांधकाम सभापती संजय कामतेकर, माजी उपनगराध्यक्ष बाबू गायकवाड, नगरसेवक बंडू हर्णे, अभि मुसळे, विराज भोसले, शिशिर परुळेकर, नगरसेविका मेघा गांगण, कविता राणे, प्रतीक्षा सावंत, मेधा सावंत, भाजपा तालुकाध्यक्ष राजन चिके, रोटरी क्लब अध्यक्ष लवू पिळणकर, जेष्ठ नागरिक संघाचे जिल्हाध्यक्ष दादा कुडतरकर, राजश्री धुमाळे, प्रज्ञा ढवण, बबलू सावंत, संदीप नलावडे, विठ्ठल देसाई, राजन परब, अण्णा कोदे, गीता कामत, संदीप वालावलकर तसेच शहरातील प्रतिष्ठित नागरिक होते उपस्थित //