होय, हे आयपीएलच्या इतिहासात पहिल्यांदाच होतंय; संडे फंडे….एकाच दिवसात तीन सुपर ओव्हर

0
565

अबुधाबी : आयपीएलच्या इतिहासात आज प्रथमच तीन सुपर ओव्हर खेळण्याचा योग आला. त्यामुळे संडे फंडेचा अनुभव क्रिकेटप्रेमींना अनुभवयाला मिळाला.

रविवारी डबल हेडर सामने खेळवले गेले. पहिला सामना कोलकत्ता आणि हैदराबादमध्ये खेळला गेला. या सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी करत कोलकाताने 20 षटकांत पाच गडी गमावून 163 धावा केल्या. या लक्ष्याचा पाठलाग करताना हैदराबादनेही 20 षटकांत सहा गडी गमावून 163 धावा केल्या. अशाप्रकारे, सामना टाय झाल्याने सुपर ओव्हर खेळवली गेली. ज्यामध्ये कोलकाताचा विजय झाला.

मुंबई इंडियन्स आणि किंग्स इलेव्हन पंजाब यांच्यातील दुसरा सामना थरारक असाच झाला. हा सामना पहिल्या सुपर ओव्हरमध्येही बरोबरीत असल्याचे पाहायला मिळाले. पहिल्या सुपर ओव्हरमध्ये पंजाबने केवळ 5 धावा केल्या. परंतु शमीच्या भेदक गोलंदाजीमुळे मुंबईला केवळ 5 धावा करता आल्या व पहिली सुपर ओव्हर टाय झाली.  पुन्हा दुसरी सुपर ओव्हर खेळवण्यात आली. दुसऱ्या सुपर ओव्हरमध्ये मुंबईची प्रथम फलंदाजी होती. मुंबईला यावेळी ११ धावा करता आल्या. त्यामुळे विजयासाठी पंजाबपुढे १२ धावांचे आव्हान होते. पंजाबला हे आव्हान यशस्वीरीत्या पेलवून दाखवले आणि त्यांनी मुंबईवर एकही विकेट न गमावता विजय मिळवला.  रविवारी सांयकाळी सुरु झालेला हा सामना सोमवारी संपला.
ताज्या बातम्यांसाठी आमच्या Whatsapp ग्रुपवर ऍड होण्यासाठी येथे क्लिक करा.