पोलिसांची धडाकेबाज कामगिरी…! एवढ्या मोठ्या रकमेची दारू पकडली

0
678

कणकवली : तब्बल १२ लाखाहून अधिक रक्कमेच्या अवैध दारुसह २२ लाख ९७ हजार ५६० रुपयांचा मुद्देमाल केला जप्त // कणकवली पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी // आयशर ट्रकमधून गोव्याहून मुंबईच्या दिशेने सुरू होती गोवा बनावटीच्या दारूची वाहतूक // ओसरगाव पासून कणकवली पर्यंत थरारक पाठलाग करून पकडला आयशर ट्रक // अवैध दारू वाहतूक होणार असल्याची कणकवली पोलिसांना मिळाली होती टीप // त्यानुसार स्वतः पोलीस निरीक्षक शिवाजी कोळी यांनी मैदानात उतरून लावली होती फिल्डिंग // १८ ओक्टोबर रोजी सायंकाळी पावणेसात वाजण्याच्या सुमारास ओसरगाव येथे आयशर ट्रक थांबवण्याचा इशारा करूनही चालकाने ट्रक नेला कणकवलीच्या दिशेने // संशयित आयशर ट्रक ( एम एच – ४३- ८१६८ ) चा पोलीस निरीक्षक कोळी यांनी सहकारी कर्मचाऱ्यांसह केला पाठलाग // सायंकाळी ७ वा.च्या सुमारास नरडवे नाक्यावर अडवला ट्रक // ट्रकमध्ये तब्बल १२ लाख ९७ हजार ५६० रुपयांची सापडली गोवा बनावटीची दारू // अवैध दारु आणि आयशर ट्रकसह २२ लाख ९७ हजार ५६० रुपयांचा मुद्देमाल केला जप्त // ट्रकचालक खालीफ बग्गु खान ( रा. उत्तरप्रदेश ) याच्यावर केलाय गुन्हा दाखल // सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक बापू खरात, हवालदार रावराणे, कॉन्स्टेबल रुपेश गुरव, चालक माने यांच्या पथकाने केली कारवाई // कॉन्स्टेबल गुरव यांनी दिलीय फिर्याद //

ताज्या बातम्यांसाठी आमच्या Whatsapp ग्रुपवर ऍड होण्यासाठी येथे क्लिक करा.