‘ती’ योजना बंद नाही : राजू मसुरकर

0
294

सावंतवाडी : दि 19 : महात्मा ज्योतिबा फुले योजने अंतर्गत कोविड आजारासाठी महाराष्ट्र शासनाकडून रुग्णांना उपचार सुविधा मोफत चालू असून सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये शासकीय जिल्हा रुग्णालयात चालू आहे. खाजगी रुग्णालयांमध्ये  शेजारी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये एप्पल सरस्वती रुग्णालय अथायु मल्टीपर्पज रुग्णालय डायमंड रुग्णालय डॉक्टर डी वाय पाटील रुग्णालय तसेच शासकीय सीपीआर रुग्णालय असून इतर मुंबई, पुणे जिल्ह्यामध्ये कुठल्याही रुग्णाला उपचारासाठी पाठवायचे असल्यास अधिक माहितीसाठी शासनाचा (18002332200) या टोल फ्री क्रमांकावर   उपचारासाठी रुग्णालयाची माहिती देऊ शकता. सध्या जनतेमध्ये संभ्रम पसरवायचा काम तसेच करून आजारावरती महात्मा फुले शासकीय योजना बंद झाली अशा प्रकारची माहिती गैरसमजातून काही व्यक्तींकडून व्हाट्सअप च्या माध्यमातून पसरवत आहे. योजनेबाबतची माहिती शासनाच्या टोल फ्री क्रमांकावरती घेण्यात यावी यासाठी रेशन कार्ड आधार कार्डची गरज रुग्णालयात लागते यासाठी रूग्णाने पिवळे केशरी अंत्योदय अन्नपूर्णा तसेच सपेद रेशन कार्ड सुद्धा चालू शकते अशी माहिती जीवनरक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजेंद्र मसुरकर यांनी दिलीय.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.