‘या’साठी शिवसैनिकांनी मानले पालकमंत्र्यांचे आभार…!

0
301

कुडाळ, दि. २० : सिंधुदुर्ग जिल्ह्याचे स्वप्न असलेले शासकीय मेडिकल काॅलेज अनेक वर्षे हुलकावणी देत होते परंतु राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे खासदार विनायक, माजी पालकमंत्री आमदार दीपक केसकर, पालकमंत्री उदय सामंत, आमदार वैभव नाईक यांनी सातत्याने पाठपुरावा करुन जिल्हावासियांना दिलेला शब्द ख-या अर्थाने पूर्ण केला म्हणून आज आम्ही शिवसेनेच्या वतीने खारेपाटण येथील सीमेवर पालकमंत्री उदय सामंत यांचे स्वागत करुन आभार मानले, असे शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते, शिवसेनेचे अतुल बंगे यांनी सांगितले. पालकमंत्री उदय सामंत काल सिंधुदुर्ग जिल्हा दौ-यावर आले असता त्यांनी खारेपाटण ते माणगाव येथील प्रत्यक्ष जाऊन, शेतक-यांचा बांधावर जाऊन पहाणी करून नुकसानभरपाईचे पंचनामे वेळेवर व्हायला पाहिजे. शेतकरी नुकसान भरपाई पासून वंचित रहाता नये, असे आदेश कृषी विभाग व महसूल यंत्रणेला देऊन शेतकरी वर्गाबरोबर चर्चा केली. याच दौ-यात पालकमंत्री उदय सामंत येत असल्याचे औचित्य साधत त्यांचे स्वागत आणि आभार मानण्याचे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय पडते यांनी आज असंख्य शिवसैनिकांच्या समवेत खारेपाटण येथे स्वागत केले. यावेळी पालकमंत्री उदय सामंत म्हणाले, मी निमीत्त आहे. यासाठी खरा पाठपुरावा हा खासदार विनायक राऊत, माजी पालकमंत्री आमदार दिपक केसकर, आमदार वैभव नाईक यांनी केला असून कायमच जिल्हावासिंयाच्या अपेक्षा पूर्ण करण्याचे काम शिवसेना करीत आहे, असे सामंत म्हणाले
यावेळी शिवसेनेचे अतुल बंगे, सिंधुदुर्ग जिल्हा बॅक अध्यक्ष शिवसेना नेते सतीश सावंत, शिवसेना नेते संदेश पारकर, कणकवली शिवसेना तालुकाप्रमुख शैलेश भोगले, युवासेना जिल्हा समन्वयक सुशिल चिंदरकर, माजी सभापती आबु पटेल, युवासेना राजु गवंडे, नितीन सावंत व असंख्य शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.