…अन्यथा घंटानाद आंदोलन ; मनसेचा इशारा

0
509

वैभववाडी, दि. २२ : राज्य सरकारने सर्व धार्मिक स्थळे लवकरच सुरू करावीत या मागणीचे निवेदन वैभववाडी मनसेच्यावतीने तहसीलदार यांना दिले आहे.धार्मिक स्थळे खुली न झाल्यास घंटानाद आंदोलन करण्याचा इशारा देखील त्यांनी दिला आहे. कोरोनाच्या काळात बंद करण्यात आलेली धार्मिक स्थळे राज्य सरकारने आता सुरू करावित अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने करण्यात आली आहे. केंद्र सरकारने अनलाँकची घोषणा केल्यानंतर राज्यातील वाईनशाँप,बिअरबार सह रेस्टॉरंट राज्य सरकारने खुली केली. मात्र अद्यापही धार्मिक प्रार्थना स्थळे राज्यात खुली करण्यात आली नाही. इतर राज्यात नियम व अटी घालून धार्मिक स्थळे सुरू करण्यात आली आहे. राज्य सरकारने येथीलही धार्मिक स्थळे लवकरात लवकर खुली करावी अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे. अन्यथा मनसे सरचिटणीस परशुराम उपरकर यांच्या नेतृत्वाखाली घंटानाद आंदोलन छेडण्यात येणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे. तहसीलदार रामदास झळके यांना निवेदन देण्यात आले.यावेळी तालुका अध्यक्ष सचिन तावडे, उपाध्यक्ष दिपक पार्टे, वि.सेना.तालुका अध्यक्ष रुपेश वारंग, शाखा अध्यक्ष दिनकर डाफळे, अजय शिंदे, दिपक मांजलकर, यशवंत डाफळे आदी उपस्थित होते.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.