कृषी पर्यवेक्षक विवेकानंद नाईक यांचे निधन

0
1224

वैभववाडी, दि. २२ : वैभववाडी कृषी विभागात कृषी पर्यवेक्षक असलेले विवेकानंद नाईक, वय ४९ यांचे आज सकाळी ह्दयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. मूळ दोडामार्ग तालुक्यातील मोरगाव येथील असलेले विवेकानंद नाईक हे गेली आठ वर्षे वैभववाडीच्या कृषी विभागात कार्यरत होते. शेतकऱ्यांच्या बांधावर जाणारा अधिकारी म्हणून त्यांची तालुक्यात ओळख होती. शेतकऱ्यांसाठी तळमळीने काम करणाऱ्यांंपैकी ते एक होते. गुरुवारी पहाटे त्यांना रक्तदाबाचा त्रास होऊ लागला. नातेवाईकांनी त्यांना शहरातील एका खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र प्रकृती अति गंभीर असल्याने त्यांना कोल्हापूर येथे नेण्याचा डॉक्टरांनी सल्ला दिला. उपचारासाठी कोल्हापूर येथे नेत असताना वाटेतच त्यांनी प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाची बातमी समजतात तालुक्यातील शेतकरी वर्गात हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, एक मुलगा असा परिवार आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.