शुटिंगबॉलच्या आजीमाजी खेळाडूंच्या एकत्रिकरणाचा प्रयत्न…!

0
174

वेगुर्ला : दि. २२ : जिल्ह्यात सद्यस्थितीत कार्यरत असलेल्या दोन शुटींगबॉल असोसिएशनच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील प्रमुख आजी-माजी निमंत्रित खेळाडूंचे एकत्रिकरण हा मुख्य उद्देश दृष्टीसमोर ठेऊन गुरुवार दिनांक १५ ऑक्टोबर २०२० ला दुपारी ३ ते ६ या वेळेत कुडाळ येथील मराठा समाज हॉल येथे शुटिंगबॉलचे माजी खेळाडु श्री. राजन गिरप, नगराध्यक्ष वेंगुर्ले, यांच्या अध्यक्षतेखाली सभा संपन्न झाली. यावेळी व्यासपीठावर श्री राजा देसाई, प्रमोद मोहिते, मालवण, श्री एकनाथ केसरकर, माणगांव, श्री. सुरेंद्र सकपाळ, त्रिंबक, श्री. सुभाष तळवडेकर, गोठणे, श्री. अमरसेन सावंत, डिगस, श्री. सलिम बोबडे, नांदगाव, श्री. बबन गवस, डोंगरपाल, श्री. शैलेश सुर्वे, तरळे अशा अनेक मान्यवरांसह सदर सभेला अनेक आजी माजी खेळाडु उपस्थित होते. सर्व मान्यवरांचे श्री.किरण शिंदे व श्री. बाबल कुडाळकर यांनी गुलाबपुष्प देऊन स्वागत केले. प्रस्ताविक करताना श्री. दिनेश पवार यांनी राज्यस्तरीय खेळाडु श्री. योगेश गावडे याची आजी-माजी खेळाडूंना एकत्र आणण्याची संकल्पना व त्यासाठी दोन्ही असोसिएशनचे पदाधिकारी व सर्व आजी माजी खेळाडूंना एकत्र आणण्यासाठी गेले दोन महिन्यांपासून कोणी कोणी कसे कसे प्रयत्न केले ते सविस्तर सांगुन सर्वांचे प्रयत्नांना यश येऊन आजचा सुवर्णयोग जुळून आला. खेळावरील प्रेम, खेळासाठी सर्वानी दिलेले योगदान हे बहुमोल आहे ते नाकारून चालणार नाही, आज मागील कोणत्याही गोष्टीवर चर्चा न करता सर्वानी मनमोकळेपणे काम करूया असे सांगितले.  सर्व उपस्थित खेळाडूंचे वतीने नगराध्यक्ष श्री राजन गिरप यांचा श्री राजा देसाई यांचे हस्ते शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच श्री राजा देसाई यांची महाराष्ट्र राज्य शुटिंग बॉल असोसिएशनच्या सदस्यपदी नियुक्ती झालेबद्दल पुष्पगुच्छ देऊन अभिनंदनही कारण्यात आले. अध्यक्षीय भाषण व सत्काराला उत्तर देताना श्री राजन गिरप म्हणाले की मी नगराध्यक्ष असलोतरी या खेळाचा माजी खेळाडू म्हणुन मी सदैव तुमच्या सोबत असेन, जिल्ह्यात स्पर्धा वाढण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करूया, या खेळासाठी स्पर्धा घेत असताना कुठे पैसे कमी पडल्यास मी सर्वतोपरी मदत करीन असे त्यांनी आश्वासनही दिले.

 

ताज्या बातम्यांसाठी आमच्या Whatsapp ग्रुपवर ऍड होण्यासाठी येथे क्लिक करा.