ठाकरेंच्या टीकेला राणे काय देणार उत्तर ?

0
917

मुंबई, दि. २६ : माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे यांची आज ४ वा. पत्रकार परिषद होणार आहे. काल रविवारच्या दसऱ्या मेळाव्यात केलेल्या भाषणात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राणे पिता- पुत्रांवर कडाडून टीका केली होती. तसेच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, अभिनेत्री कंगनावर देखील सडकून टीका करण्यात आली होती. मुख्यमंत्र्यांच्या या टीकेला नारायण राणे आज प्रत्युत्तर देण्याची शक्यता आहे. दुपारी ४ वा.  होणाऱ्या नारायण राणे यांच्या पत्रकार परिषदेत ते नेमकं काय बोलणार, कालच्या टीकेला कसं प्रत्युत्तर देणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिलय.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.