धक्कादायक ! ; बेकायदेशीर वाळू उत्खनन ; प्रशासनाचे दुर्लक्ष

0
561

कुडाळ : दि ३१ : देवली मालवण येथील चीपी येथे देवली पुलाच्या बाजूला शंभर मीटर अंतरावर राजरोसपणे बेकायदेशीर रित्या वाळू उत्खनन सुरू आहे. दहा ते बारा होड्या उत्खनन करत आहेत.कुडाळ- मालवणचे प्रांताधिकारी व मालवणचे तहसिलदार यांना फोन करूनही कोणतीही दखल घेतली नाही असा आरोप स्थानिक ग्रामस्थ भिकाजी पवार यांनी केला. या ठिकाणी आत्ता हे उत्खनन सुरू आहे. याबाबत जिल्हाधिकारी यांनी कारवाई करण्याची मागणी पवार यांनी केली आहे.

ताज्या बातम्यांसाठी आमच्या Whatsapp ग्रुपवर ऍड होण्यासाठी येथे क्लिक करा.