आमदार वैभव नाईक यांच्याकडे डॉक्टर्स असोसिएशनची “ही” मागणी

0
398

कुडाळ : सिंधुदुर्ग जिल्ह्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर श्रीमंत हरीभाऊ चव्हाण यांचा कारभार वादग्रस्त असताना त्यांना जबाबदारीचे पद आणि पदोन्नती कशी देण्यात आली, असा प्रश्न सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व डॉक्टर्स अलोपॅथी, आयुर्वेद व होमिओपॅथी व वेगवेगळ्या असोसिएशन सदस्यांनी करत त्यांनी चव्हाण यांच्या बदलीची मागणी आमदार वैभव नाईक यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.
डॉ. श्रीमंत चव्हाण हे यापूर्वी बीड येथे कार्यरत होते. त्याठिकाणी भ्रष्टाचार प्रकरणात त्यांचे निलंबन झाले होते. त्यानंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील त्यांचा कार्यकाळ वादग्रस्त ठरला आहे. कुडाळ, देवगड, दोडामार्ग, कणकवली आणि कट्टा येथील कारभार वादग्रस्त ठरल्यानंतर त्यांना इतके जबाबदारीचे पद व पदोन्नती कशी काय देण्यात आली हा आम्हा सर्वांना मोठा धक्काच आहे. जिल्हा शल्य चिकित्सक पदावर रुजू झाल्यावर त्यांनी आकसाने २९ रोजी कुडाळ येथील २९ वर्षांपासून प्रॅक्टिस करणारे डॉ. संजय गणेश निगुडकर यांना सोनोग्राफी रेकॉर्डस तपासणीच्या निमित्ताने त्रास देण्याचा प्रयत्न केला. हे सर्वांनाच माहीत आहे. जिल्ह्यातील इतर डॉक्टर्सना देखील असाच त्रास देण्याचा प्रयत्न केला. सर्व डॉक्टर्सनी कोरोना काळात जिल्हा रुग्णालयात जमेल तशी मदत केली. चव्हाण यांचा पूर्वइतिहास पाहील्यास त्यांच्या मध्ये बदल होणे शक्य नाही. त्यामुळे या पदासाठी योग्य सक्षम पूर्वग्रहदूषित नसलेली व्यक्तीची नेमणूक करावी, अशी मागणी सर्व डॉक्टर्स असोसिएशनने केली आहे. शिवसेना कार्यकर्ता मेळाव्याला मुळातच उशिर झाल्याने मंत्री यांची भेट झाली नाही. दरम्यान खासदार विनायक राऊत यांच्याशी चर्चा करण्यात आली. यावेळी जिल्ह्यातील नामवंत डॉक्टर्स यावेळी उपस्थित होते.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.