महिला भाजपतर्फे ‘जागर आदिशक्तीचा, सन्मान नारीशक्तीचा’

0
369

सावंतवाडी : दि. ०१ : दरवर्षी भाजप महिला मोर्चा सावंतवाडी तर्फे ‘जागर आदिशक्तीचा, सन्मान नारीशक्तीचा’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत. यामाध्यमातून विविध क्षेत्रात महत्वपूर्ण कामगिरी बजावणाऱ्या रणरागिणीचा सन्मान करण्यात येतो. दरवर्षीप्रमाणे यंदाही या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होतं. भाजपाच्या महिला जिल्हाध्यक्षा संध्या तेरसे यांच्या हस्ते विविध क्षेत्रातील महिलांचा सन्मान करण्यात आला.

यात सामाजिक, राजकीय, उद्योग, पत्रकार यासारख्या क्षेत्रात कार्य करणाऱ्या महिलांचा गौरव करण्यात आला. गेली ३९ वर्ष पोलीस सेवेत कार्यरत असणाऱ्या राजलक्ष्मी जयप्रकाश राणे, होमिओपॅथी डॉक्टर रेवती विनायक लेले, ऍड मरियम डिंगणकर, श्री शारदा मंदिर ज्युनिअर केजीच्या शिक्षिका सरिता फडणीस, ब्रम्हकुमारी कांचन दीदी, उद्योजिका शुभांगी काकतकर, सिंधुदुर्ग लाईव्हच्या सबएडीटर जुईली पांगम, सुप्रिमोज जिमच्या ऑनर नयना सावंत, उद्योजिका शिल्पा सावंत यांचा महिला जिल्हाध्यक्षा संध्या तेरसे यांच्या हस्ते गौरविण्यात आले. शाल, श्रीफळ आणि प्रमाणपत्र देऊन या रणरागिणीना सन्मानित करण्यात आले.

दरम्यान, जिल्हाध्यक्षा संध्या तेरसे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळी व्यासपीठावर भाजप सरचिटणीस रेखा काणेकर, आंबोली मंडल महिला तालुका अध्यक्ष गीता परब, भाजपा महिला पदाधिकारी मोहिनी मडगावकर, मिसबा शेख आदी उपस्थित होते. आभार भाजपा पदाधिकारी मोहिनी मडगावकर यांनी मानले.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.