उद्या आयपीएल फायनलचा थरार आणि ‘माय आयपीएल स्टार’स्पर्धेचा बक्षीस सोहळा ; सिंधुदुर्ग लाईव्ह आणि एलपी स्पोर्ट्स वेंगुर्लाच आयोजन 

0
328

सिंधुदुर्ग, दि. ०९ : मुंबई आणि दिल्लीमध्ये मंगळवारी होणाऱ्या आयपीएलच्या फायनलचा थरार सिंधुदुर्ग लाईव्हवर क्रिकेटप्रेमींना अनुभवता येणार आहे. अगदी सकाळपासूनच जिल्ह्यातील नामवंत क्रिकेटर आणि तज्ञ यांच्यासोबत सिंधुदुर्ग लाईव्हच्या स्टुडीओत चर्चा रंगणार आहे. तसेच #lpsportsvengurla आयोजित आणि कोकणचं महाचॅनेल #sindhudurglive प्रस्तुत खास घेतलेल्या ऑनलाईन #myiplstar स्पर्धेतील विजेत्यांना आकर्षक बक्षिसांच वितरणही होणार आहे.

सर्वांच लक्ष लागून राहिलेल्या यंदाच्या आयपीएलचा धमाकेदार अंतिम सामना उद्या मंगळवारी रंगणार आहे. मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कपिटल्स यांच्यात होणाऱ्या या सामन्याची उत्सुकता आता शिगेला पोहचली आहे. मैदानातील रंगणाऱ्या या सामन्याचा थरार तुम्हाला सिंधुदुर्ग लाईव्हवर द्देखील अनुभवता येणार आहे. कारण अगदी सकाळपासूनच जिल्ह्यातील नामवंत क्रिकेटर, तज्ञ, विश्लेषक सिंधुदुर्ग लाईव्हच्या स्टुडिओत चर्चेसाठी उपस्थित राहणार आहेत. या क्रिकेट जगतातल्या तज्ञांकडून या सामान्याच इत्यंभूत विश्लेषण करणार आहेत. तसेच आपल्या खेळाविषयीच्या आठवणीही जागवणार आहेत.

त्याचबरोबरीन ज्याची सर्वजण आतुरतेने वाट पाहत होते त्या #LPsportsvengurla आयोजित आणि कोकणचं महाचॅनेल #sindhudurglive प्रस्तुत #myiplstar या खास ऑनलाईन प्रश्नमंजुषा स्पर्धेच बक्षीस वितरण या क्रिकेटच्या मातब्बर मंडळींच्या हस्ते होणार आहे.  त्यामुळे आयपीएलचा मैदानातील तो जोष, तो जल्लोष सिंधुदुर्ग लाईव्हवर देखील क्रिकेटप्रेमींना, चाहत्यांना अनुभवता येणार असल्याने ही संधी अजिबात दवडू नका.
ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.