कोकण पदवीधर मधून शिवसेनेचे संजय मोरे यांचा विजय निश्चित – आमदार वैभव नाईक

0
692
मालवण : कोकण पदवीधर निवडणुकीत शिवसेनेचाच विजय हा निश्चित आहे. आमचे उमेदवार संजय मोरे हे पहिल्या पसंतीची मते मिळवून विजयी होतील असा विश्वास शिवसेना जिल्हाप्रमुख तथा आमदार वैभव नाईक यांनी व्यक्त केला.
कोकण पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीसाठी प्रचाराला सुरुवात झाली आहे. आमदार वैभव नाईक यांनी निवडणुकीसंदर्भात आज मालवण शिवसेना शाखेत पदाधिकारी, कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. त्यानंतर मालवण शहर व ग्रामीण भागात आमदार वैभव नाईक यांनी घेतल्या पदवीधर मतदार व शिक्षक पदवीधर मतदार यांच्या गाठीभेटी घेतल्या. यावेळी तालुकाप्रमुख बबन शिंदे, उपतालुका प्रमुख जिप सदस्य हरी खोबरेकर, युवासेना तालुकाप्रमुख मंदार गावडे, उपतालुका प्रमुख अमित भोगले, नगरसेविका सेजल परब, नितीन वाळके, तृप्ती मयेकर, बाबी जोगी, किरण वाळके, गणेश कुडाळकर, तपस्वी मयेकर, दर्शन म्हाडगूत, महेंद्र म्हाडगूत, दीपा शिंदे व अन्य उपस्थित होते. पदवीधर मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून शिवसेनेचे उमेदवार संजय मोरे यांचा हे विजयी होतील असा विश्वास आमदार वैभव नाईक यांनी व्यक्त केला.
ताज्या बातम्यांसाठी आमच्या Whatsapp ग्रुपवर ऍड होण्यासाठी येथे क्लिक करा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here