निकाल स्पष्ट व्हायला उशीर : निवडणूक आयोग

0
157

बिहार, दि. १० : निवडणूक निकालाची आतापर्यंत केवळ २० टक्के मतमोजणी झाली असून निकाल स्पष्ट व्हायला उशीर लागणार असल्याचं निवडणूक आयोगानं कळवलं आहे.

पत्रकार परिषदेत निवडणूक आयोगानं सांगितलं आहे की, बिहार निवडणुकीत सुमारे ४.१० कोटी मतं पडली आहेत. त्यापैकी आतापर्यंत ९२ लाख मते मोजली गेली आहेत. पूर्वी मतमोजणीच्या २५ – २६ फेऱ्यांचा वापर होता, यावेळी या फेऱ्यांची संख्या ३५ वर गेली आहे. त्यामुळे मतमोजणी रात्री उशीरापर्यंत सुरू राहू शकते असं बिहारचे मुख्य निवडणूक अधिकारी (सीईओ) एचआर श्रीनिवास यांनी सांगितलं आहे.

निवडणूक आयोगाच्या वेबसाईटनुसार आता सध्या २४३ पैकी ४३ जागा अशा आहेत जिथं दोन उमेदवारांच्या मतांमध्ये केवळ १ हजार मतांचं किंवा त्यापेक्षा कमी अंतर आहे. ८० टक्के मतांची मोजणी अजून व्हायची आहे.

 आतापर्यंतचे निकालाचे ‘हे’ आहेत अपडेट 

▪️ एनडीए : 132

▪️ महागठबंधन : 100

▪️ BJP : 75

▪️ RJD : 62

▪️JDU : 51

 

ताज्या बातम्यांसाठी आमच्या Whatsapp ग्रुपवर ऍड होण्यासाठी येथे क्लिक करा.