सोशल मिडियाचे स्वातंत्र्य अबाधित रहावे ही भाजपाची भूमिका : अविनाश पराडकर

0
199

वेंगुर्ला, दि. १३ : महाराष्ट्रामध्ये ठाकरे सरकारच्या आश्रयाने सोशल मिडियामध्ये जो उच्छाद मांडला जात आहे व ज्या पद्धतीने मिडियाची मुस्कटदाबी केली जात आहे, ती रोखण्यात यावी व सोशल मिडियाचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य अबाधित राहिले पाहिजे अशी भुमिका भाजपाची आहे असे प्रतिपादन सोशल मिडिया सिंधुदुर्ग जिल्हा संयोजक अविनाश पराडकर यांनी केले.

वेंगुर्ला भारतीय जनता पार्टीची मासिक सभा तालुका कार्यालयात पार पडली. यावेळी भाजपमध्ये सोशल मिडियाला किती अनन्यसाधारण महत्त्व आहे याबाबत पराडकर यांनी मार्गदर्शन केले. पंतपधान नरेंद्र मोदी यांच्या अंत्योदयाच्या योजना सोशल मिडीयाच्या माध्यमातून घराघरात पोहचवण्यासाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागावे असे आवाहन केले. यावेळी तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर, जिल्हा चिटणिस निलेश सामंत, जेष्ठ नेते बाळा सावंत, जिल्हा उपाध्यक्ष सोमनाथ टोमके, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष प्रसाद पाटकर, सोशल मिडीया प्रमुख व परबवाडा सरपंच पपू परब, महिला शहर अध्यक्षा प्रार्थना हळदणकर आदी उपस्थित होते.

यावेळी जिल्हा चिटणिस अॅड. सुषमा प्रभूखानोलकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व राष्ट्रीय अध्यक्ष जगतप्रकाश नड्डाजी यांच्या नेतृत्वाखाली बिहार राज्यासह मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश, गुजराथ, कर्नाटक व हरियाणा राज्यात पक्षाने घवघवीत यश संपादन केल्याबद्दल अभिनंदनाचा ठराव मांडला. तसेच संपूर्ण देशात भाजपाने जो विजय संपादन केला तो पक्षाच्या संघटनात्मक बांधणीच्या विजय असल्याचे सांगितले. त्यामुळेच बुथरचनेला भाजपामध्ये सर्वोच्च स्थान आहे. त्यामुळे ‘जिकडे बुथ सक्षम तिकडे भाजपा भक्कम‘ अशी परिस्थिती आहे. जिल्हा सरचिटणीस प्रसन्ना देसाई यांनी तालुक्यातील बुथरचनेचा आढावा घेतला. तसेच बुथरचना करताना सर्वांना सामावून घेऊन सर्व सामावेशक बुथकमिटी स्थापन करण्याबाबत मार्गदर्शन करुन २० व २१ नोव्हेंबर रोजी होणा-या ‘कार्यकर्ता प्रशिक्षण वर्गाची‘ माहिती देण्यात आली .

यावेळी युवा मोर्चा तालुका सरचिटणीस पदी केशव पकाश नवाथे यांची निवड करण्यात आली. तसेच युवा मोर्चा तालुका चिटणिसपदी समीर नाईक (मठ) यांची निवड करण्यात आली. आभार तालुका सरचिटणीस प्रशांत खानोलकर यांनी मानले.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.