हजारो ट्रम्प समर्थक वॉशिंग्टन डीसीत एकत्र; निकालाचा केला निषेध

0
243

वॉशिंग्टन :  दि. १५ : अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणूक निकालाला विरोध दर्शवत हजारो ट्रम्प समर्थक शनिवारी अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टन डीसीमध्ये एकत्र जमले होते. यावेळी त्यांनी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना पाठिंबा दर्शवत फलक आणि बॅनर झळकावत घोषणाबाजी केली.

शनिवारी सकाळी व्हाईट हाऊसजवळील फ्रीडम प्लाझा येथे ट्रम्प समर्थक एकत्र जमायला सुरुवात झाली, दुपारपर्यंत तिथे हजारोंच्या संख्येने लोकांची मोठी गर्दी जमली. माजी टी पार्टी कार्यकर्ते अॅमी क्रिमर यांनी या निषेध आंदोलनाचे आयोजन केले होते. यासाठी त्यांनी शुक्रवारी प्लाझा या ठिकाणी आंदोलनासाठी १०,००० लोकांची परवानगी काढली होती. मात्र, प्रत्यक्षात आंदोलनावेळी किती लोक जमले होते याची आकडेवारी समोर येऊ शकलेली नाही.

 

ताज्या बातम्यांसाठी आमच्या Whatsapp ग्रुपवर ऍड होण्यासाठी येथे क्लिक करा.