‘इफ्फी’च्या नोंदणीला सुरुवात..!

0
188

पणजी, दि. १९ : यंदा जानेवारी महिन्यात होणाऱ्या आंतरराष्ट्रीय महोत्सव म्हणजेच इफ्फीसाठी प्रतिनिधी नोंदणी सुरु झाली आहे. नोंदणीसाठी १ हजार रुपये शुल्क भरावे लागणार आहे. १६ ते २४ जानेवारी २०२१ या कालावधीत यंदाचा महोत्सव होणार आहे.

दरवर्षी २० ते ३० नोव्हेंबर या काळात राज्यात इफ्फीचे आयोजन केले जाते. मात्र, यंदा कोरोना संसर्गामुळे पुढे ढकलण्यात आलं. त्यानुसार १६ ते २४ जानेवारी २०२१ या कालावधीत यंदाचा महोत्सव होणार आहे. त्यासाठी iffigoa.org या संकेतस्थळावर प्रतिनिधी नोंदणी सुरु झाली आहे. हा महोत्सव प्रत्यक्ष आणि व्हर्च्युअल अशा दोन्ही पद्धतीने होणार आहे, अशी माहिती ईएसजीचे उपाध्यक्ष सुभाष फळदेसाई यांनी दिलीय.

ताज्या बातम्यांसाठी आमच्या Whatsapp ग्रुपवर ऍड होण्यासाठी येथे क्लिक करा.