सोनिया गांधींना सोडावी लागली दिल्ली ; हे आहे कारण

0
387

नवी दिली : दि. २० : दिल्लीतल्या वाढत्या प्रदूषणामुळे काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि त्यांचे पुत्र राहुल गांधी यांनी दिल्ली शहर सोडलं आहे. काही वेळापूर्वीच त्यांनी पणजी विमानतळावर येत आता पुढचे काही दिवस ते गोव्यात राहणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. दिल्लीची हवा मानवत नसल्याने सोनिया गांधी यांना शहर काही दिवसांसाठी सोडण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिली होता. त्यानंतर आता काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि त्यांचे पुत्र खासदार राहुल गांधी हे गोव्यात दाखल झाले आहेत. पुढचे काही दिवस या दोघांचाही मुक्काम गोव्यात असणार आहे.

ताज्या बातम्यांसाठी आमच्या Whatsapp ग्रुपवर ऍड होण्यासाठी येथे क्लिक करा.