होडावडा ग्रा.पं. नुतन इमारतीचे आम. दीपक केसरकरांच्या हस्ते उदघाटन

0
744

वेंगुर्ला, दि. २१ : तालुक्यातील होडावडा ग्रामपंचायत नुतन इमारतीचे माजी गृहराज्यमंत्री, विद्यमान आमदार दीपक केसरकर यांच्या हस्ते फित कापून तसेच फलकाचे अनावरण करून करण्यात आले.

जनसुविधा योजना व १४ वा वित्त आयोग अंतर्गत या नुतन सुसज्ज ग्रामपंचायत इमारतीची उभारणी करण्यात आली आहे. या उदघाटन प्रसंगी व्यासपीठावर यावेळी पं स सभापती अनुश्री कांबळी, गटविकास अधिकारी उमा पाटील, माजी सभापती तथा शिवसेना तालुकाप्रमुख यशवंत परब, पं स माजी सभापती तथा विद्यमान सदस्य सुनील मोरजकर, सरपंच अदिती नाईक, सचिन वालावलकर, निलेश चमणकर, मातोंड सरपंच जानवी परब, होडावडा उपसरपंच रसिका केळुसकर, उपजिल्हाप्रमुख सुनील डूबळे, शहरप्रमुख अजित राऊळ, अण्णा वजराठकर, नम्रता बोवलेकर, देवा कांबळी, उपतालुका प्रमुख शशिकांत परब, पीएसआय पाटील, नितीन मांजरेकर, अरविंद नाईक, रवी केळुसकर, ग्रा प सदस्य सुरेखा परब, उत्तम धुरी, संदेश सावंत उपस्थित होते.

दरम्यान यावेळी सरपंच अदिती नाईक यांनी उपस्थित मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. तसेच यावेळी झांंटये कॅशु चे शुभम झांंटये यांच्या वतीने दिपक केसरकर यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत तर अदिती नाईक यांचे अभिनंदन करण्यात आले. तसेेेच यानंतर ग्रामपंचायतचे माजी सरपंच दिगंबर दळवी, रमाकांत नाईक तसेच विनामूल्य जमीन देणारे जमीन मालक रामचंद्र नाईक, प्रसाद नाईक, सर्व अंगणवाडी सेविका, आरोग्य कर्मचारी यांचा शाल व श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला सरपंच अदिती नाईक यांनी या इमारत बांधकामासाठी बरेच अडथळे आले मात्र सर्वांच्या सहकार्याने ही सुसज्ज इमारत उभी राहिल्याचे सांगत यासाठी सहकार्य करणाऱ्या सर्वांचे आभार मानले. होडावडा ग्रामपंचायत ची अतिशय सुंदर इमारत उभारण्यात आली आहे. पुढील काळात या इमारतीच्या हॉल साठी निधी देण्यात येईल. तसेच तात्काळ ग्रामपंचायत साठी एक कॉम्प्युटर, प्रिंटर व प्रोजेक्टर या आठवड्यात तात्काळ देण्यात येईल. नागरिकांनी कोव्हीड संपला असा गृहीत धरू नका. शासनाच्या नियमांचे पालन करणे अत्यंत अवश्याक आहे. शाळा सुरू होत आहेत. मुलांच्या सुरक्षिततेसाठी मास्क सॅनिटायझर शाळेत असणे आवश्यक आहे. यासाठी आमदार फंडातून तालुक्यला निधीही देण्यात येईल. तसेच पुढील काळात सुसज्ज अशी अम्ब्युलन्सही वेंगुर्ला तालुक्यला देण्यात येईल असे यावेळी आमदार दीपक केसरकर यांनी सांगितले.

ग्रामपंचायत मार्फत लोकाभिमुख कार्य, लोकांच्या हिताचे काम व्हायला हवे. ही सुंदर वस्तू उभारताना ज्यांचे हात लागले त्यांचे मी कौतुक करते. आज वेगवेगळ्या योजना लोकांपर्यंत पोचणे ग्रामपंचायतीचे काम आहे. आपली आर्थिक उन्नती आपला विकास करणे हे आपल्या हातात आहे. तालुक्याची प्रथम नागरिक म्हणून मी नेहमीच तुमच्या सोबत आहे. असे यावेळी सभापती अनुश्री कांबळी यांनी सांगितले.

गावाची ग्रामपंचायत सुसज्ज असेल व एकाच छताखाली सर्व प्रशासकीय कामे होत असतील तर नागरिकांना त्याचा मोठा फायदा होतो. हे प्रयत्न होडावडा ग्रामपंचायत कडून करण्यात येत आहेत. या गावाला लाखो रुपयांचा निधी दिपक केसरकर यांच्या माध्यमातून देण्यात आला आहे. तसेच जि प सदस्य नितिन शिरोडकर यांनीही निधी मिळवून देण्यात गावासाठी मोलाचे योगदान आहे. ग्रामपंचायत पुढील काळात चांगले यश संपदान करेल अशी इच्छा शिवसेना तालुकाप्रमुख यशवंत परब यांनी व्यक्त केली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन काका सावंत यांनी केले.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.