…तर स्थानिकांवरही कारवाई नको : अमित इब्रामपूरकर

0
210

मालवण, दि. २१ : विना मास्क फिरणाऱ्या पर्यटकांवर कारवाई होणार नसेल तर सामान्य नागरिकांवरही करू नका अशी मागणी मनविसेचे माजी जिल्हाअध्यक्ष अमित इब्रामपूरकर यांनी दिली आहे.

सोशल माध्यमांमध्ये आमदार वैभव नाईक हे मालवण नगरपालिका प्रशासनाला मालवणात येणाऱ्या पर्यटकांवर जर ते विनामास्क फिरत असतील तर त्यांच्यावर कारवाई करू नका पण मालवणातील नागरिकांवर, लोकप्रतिनिधींवर कारवाई करा अशा प्रकारचे सूचना देत असल्याचा मेसेज फिरत आहे. नियम सर्वसामान्य जनतेला एकच असेल आणि विनामास्क फिरणाऱ्या पर्यटकांवर आपण कारवाई करणार नसाल तर अशा कारवाईतून मालवण शहराबरोबरच मालवण तालुक्यातील अन्य गावातुन शहरात येणाऱ्या नागरिकांवर तसेच लोकप्रतिनीधींवर देखील अशाप्रकारे आपण कारवाई करू नये. अशाप्रकारची मागणी आपण मनसेच्यावतीने मनसे तालुका अध्यक्ष विनोद सांडव यांच्या नेतृत्वाखाली मालवण नगरपालिकेचे मुख्याधिकारी श्री. जयंत जावडेकर यांची भेट घेवुन करणार असल्याची माहिती मनविसेचे माजी जिल्हाअध्यक्ष अमित इब्रामपूरकर यांनी दिली आहे.

ताज्या बातम्यांसाठी आमच्या Whatsapp ग्रुपवर ऍड होण्यासाठी येथे क्लिक करा.