वेंगुर्ला इनरव्हील क्लबची वृद्धाश्रमात दिवाळी साजरी..!

0
96

वेंगुर्ला, दि. २१ : इनरव्हील क्लब वेंगुर्ल्याच्या पदाधिका-यांनी माड्याचीवाडी-कुडाळ येथील जिव्हाळा वृद्धाश्रमातील वृद्धांसमवेत दिवाळी साजरी केली. क्लबतर्फे वृद्धांना मिठाई, दिवाळी फराळ, पणत्या, मोती साबण व उटणे आदी साहित्य देण्यात आले. यावेळी इनरव्हील क्लब अध्यक्षा गौरी मराठे, आयपीपी वृंदा गवंडळकर आदी पदाधिकारी उपस्थित होते. या वृद्धाश्रमात ३० वयोवृद्ध आणि २ मुले अशी एकूण ३२ जणांचा समावेश आहे. पुढील काळात आश्रमात देण्यात येणा-या सुविधांबाबत आश्रमचे ट्रस्टी बिर्जे यांच्याशी चर्चा करण्यात आली.

ताज्या बातम्यांसाठी आमच्या Whatsapp ग्रुपवर ऍड होण्यासाठी येथे क्लिक करा.