नारायण राणे ऐकणार जिल्ह्यातील जनतेची गाऱ्हाणी..! 

0
834

कणकवली : खासदार नारायण राणे ऐकणार जिल्ह्यातील जनतेची गाऱ्हाणी // मंगळवार २४ नोव्हेंबरला कणकवली एसटी स्टँडसमोरील आपल्या संपर्क कार्यालयात ऐकणार जनतेच्या समस्या // सकाळी ११ ते दुपारी २ वाजेपर्यंत जिल्ह्यातील जनतेला आपल्या समस्या थेट राणेंकडे मांडता येणार // महाविकास आघाडी सरकारच्या काळात सिंधुदुर्गात जिल्हा विकासाला बसलीय खीळ // नियोजन आराखड्याला लागलेल्या कात्रीमुळे जिल्ह्याचा विकास झालाय ठप्प // रस्ते गेलेत खड्ड्यात // लोकांच्या रोजगाराचा झालाय बट्ट्याबोळ // शेतकरी अवकाळी पावसाने झालेत हवालदिल // तर मच्छिमारांचे झालेत हाल // सत्ताधारी केवळ शाब्दिक घोषणा करण्यात आहेत मश्गुल // या पार्श्वभूमीवर खासदार नारायण राणेंना थेट भेटून आपली समस्या मांडून प्रश्न सोडवून घेण्याची मिळतेय संधी // लोकप्रतिनिधी, पदाधिकारी आणि जनतेने आपल्या समस्यांच्या लेखी निवेदनासह उपस्थित राहण्याचे भाजपा तालुकाध्यक्ष संतोष कानडे यांनी केलेय आवाहन //

ताज्या बातम्यांसाठी आमच्या Whatsapp ग्रुपवर ऍड होण्यासाठी येथे क्लिक करा.