मानव अधिकार संघटनेच्या तालुकाध्यक्षपदी अरुण मोर्ये..!

0
123

रत्नागिरी, दि. २१ :  रत्नागिरी तालुक्यातील सत्कोंडी गावचे सुपुत्र अरुण मोर्य यांची मानवधिकार संघटनेच्या रत्नागिरी तालुक्याच्या तालुकाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे . त्यामुळे त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
सत्कोंडी गावातील लोकांच्या गळ्यातील ताईत असलेले अरुण मौर्य हे सामाजिक कार्यकर्ते म्हणून सुपरिचित आहेत .गेली सलग पाच वर्ष सतंकोंडी ग्रामपंचायतीमध्ये तंटामुक्ती समिती अध्यक्षपदी बिनविरोध निवडून येण्याचा करिष्मा त्यांनी केला आहे. तंटामुक्त समितीच्या माध्यमातून गावाला एकसंघ ठेवण्याचे काम त्यांनी उत्तमरित्या केले आहे. अनेक सामाजिक उपक्रम सतकोंडी सारख्या दुर्गम भागात घेण्यामध्ये मोर्येे यांचा मोठा हात आहे. तसेच उत्तम वक्ते म्हणूनही ते सर्वदुर परिचित आहेत. कोकण मराठी साहित्य परिषदेचे सदस्य म्हणूनही त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटविला आहे. अखिल भारतीय ओ बी सी महासभेचे राज्य कार्याध्यक्ष म्हणूनही ते काम करत आहेत.गेल्या दोन वर्षापासून मानवाधिकार संघटनेमध्ये सदस्य म्हणून काम करताना आपल्या कामाचा वेगळा असा ठसा त्यांनी उमटविला.  त्यांच्या या कार्याचा गौरव म्हणूनच यावेळी त्यांची मानवाधिकार संघटनेच्या रत्नागिरी तालुका अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.
अतिशय  स्पष्टवक्ते असलेले परंतु सर्वांना समजूनही घेण्याच्या स्वभावाने अरुण मोर्ये जनतेमध्ये ओळखले जातात. त्यांना मिळालेल्या या पदाचा उपयोग ते सर्वसामान्य जनतेसाठी करतील असा विश्वास येथील जनतेमध्ये आहे .

ताज्या बातम्यांसाठी आमच्या Whatsapp ग्रुपवर ऍड होण्यासाठी येथे क्लिक करा.