कणकवली पोलीस निरीक्षकपदी संजय धुमाळ

0
503

कणकवली : संजय मधुकर धुमाळ यांची कणकवली पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षकपदी बदली // पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांनी पीआय धुमाळ यांची कणकवली पोलीस ठाण्यात केली बदली // धुमाळ यांची ठाणे ग्रामीण मधून सिंधुदुर्गात झाली होती बदली // १८ नोव्हेंबर रोजी पीआय धुमाळ जिल्हा नियंत्रक कक्षात झाले होते हजर // त्यानंतर कणकवलीत रिक्त असलेल्या पोलीस निरीक्षकपदी संजय धुमाळ यांच्या बदलीचे एसपी दाभाडे यांनी आज काढले आदेश // कणकवली पोलीस ठाण्याचे तत्कालीन पोलीस निरीक्षक शिवाजी कोळी यांच्या बदलीनंतर कणकवली पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक पदी करण्यात आली नव्हती नियुक्ती // एपीआय सागर खंडागळे यांच्याकडे होता पीआय पदाचा अतिरिक्त कार्यभार // तर मागील १५ दिवसांत कणकवली शहरासह लगतच्या कलमठ गावांत झालेल्या घरफोडी आणि चोरींच्या पार्श्वभूमीवर सागरी सुरक्षा दल पदी नियुक्त असलेल्या पीआय कोळी यांच्याकडे कणकवली पोलीस ठाण्याचा देण्यात आला होता तात्पुरता अतिरिक्त कार्यभार // आता पोलीस निरीक्षक संजय धुमाळ यांच्या रुपात कणकवली पोलीस ठाण्याला मिळाले नियमित पोलीस निरीक्षक // सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्वाधिक लांबीचा राष्ट्रीय महामार्ग असलेला आणि जिल्ह्यातील राजकीय घडामोडींचे केंद्रबिंदू असलेल्या कणकवली तालुक्यात कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची पीआय धुमाळ यांच्यावर असणार जबाबदारी // तसेच अलीकडेच पंधरवड्यात झालेल्या चोऱ्यांचा छडा लावून चोरट्यांच्या मुसक्या आवळण्याचीही जबाबदारी असणार धुमाळ यांच्यावर //

ताज्या बातम्यांसाठी आमच्या Whatsapp ग्रुपवर ऍड होण्यासाठी येथे क्लिक करा.