…होय आमदार नितेश राणेंनीच कोव्हीड काळात दिला सर्वाधिक निधी

0
227

कणकवली: कोव्हीड काळात राणे कुटुंबियांनीच सिंधुदुर्ग वासीयांना दिली साथ // आमदार नितेश राणेंनीच कोव्हीड काळात जिल्हा रुग्णालयाला सत्ताधारी खासदार , आमदारांपेक्षा दिला सर्वाधिक निधी // माहितीच्या अधिकारातून सत्ताधाऱ्यांच्या पोकळ बढायांचा झाला पोलखोल // राणे कुटुंबियांनाच सिंधुदुर्गच्या जनतेच्या पालकत्वाची तळमळ असल्याचे झाले पुन्हा अधोरेखीत // राज्यातील सत्ताधारी खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक, आमदार दीपक केसरकर आणि विरोधी पक्षाचे आमदार नितेश राणे यांनी कोव्हीड काळात जिल्हा रुग्णालयाला दिलेल्या स्थानिक विकास निधीची आकडेवारी माहितीच्या अधिकारातून आली उजेडात // भाजपा आमदार नितेश राणे यांनी स्थानिक विकास निधीतून जिल्हा रुग्णालयाला दिला तब्बल १५ लाख ७७ हजार रुपयांचा निधी // तर सत्ताधारी खासदार विनायक राऊत यांनी दिला केवळ ३ लाखांचा निधी // तर राज्यात सत्ताधारी असलेले शिवसेनेचे आमदार तथा माजी पालकमंत्री दीपक केसरकर आणि आमदार वैभव नाईक यांनी स्थानिक विकास निधीतून दिला नाहीय एकही रुपयांचा निधी // एकीकडे जिल्ह्याच्या विकासाच्या वल्गना करताना दुसरीकडे कोव्हीड काळात सिंधुदुर्गवासीयांना वाऱ्यावर सोडणारे सत्ताधारी लोकप्रतिनिधिंचे दाहक वास्तव आले समोर // पी पी ई किट, मास्क, सॅनिटायजर, ग्लोव्हज, रॅपिंग बॅग्ज ,रुग्णाचे जेवण, आदी साठी खासदार , आमदार स्थानिक विकास निधीतून प्राप्त निधीबाबत माहितीच्या अधिकारात मालवण पं स सभापती अजिंक्य पाताडे यांनी केली होती विचारणा // जिल्हा रुग्णालयाकडून दिलेल्या अधिकृत माहितीनुसार शिवसेनेचे सत्ताधारी आमदार तथा माजी पालकमंत्री दीपक केसरकर, आमदार वैभव नाईक यांनी स्थानिक विकास निधीचा एकही रुपया जिल्हा रुग्णालयाला दिला नसल्याचे झाले उघड //

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.