‘त्या’ सरपंचांच्या अविश्वास ठरावावर शिक्कामोर्तब होणार…?

0
576

दोडामार्ग: दि. २२ : तालुक्यातील आयी व मांगेली या दोन ग्रामपंचायत सरपंचावर सदस्यांनी मंजूर केलेल्या अविश्वास ठरावावर अंतिम शिक्कामोर्तब होण्यासाठी अखेर उद्या विशेष ग्रामसभेचे दोन्ही ठिकाणी आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे सदस्य यांनी नाकारलेल्या मात्र, थेट जनतेतून निवडून आलेल्या सरपंच यांचे भवितव्य पुन्हा एकदा मतदार राजाच्या हातात आले आहे. सरपंच यांचे अंतिम भवितव्य ठरवणाऱ्या या उद्याच्या ग्रामसभांकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.

सरपंच यांचेवर दाखल मंजूर झालेल्या अविश्वास ठरावावर उद्या पुन्हा एकदा जनता मतदार मतदान करणार आहे. हे प्रक्रिया गुप्त मतदान पद्धतीने होणार असून उद्या सोमवारी २३ नोव्हेंबरला सकाळी ११ वाजता दोन्ही ग्रामपंचायत कार्यालयात विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आलेले आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात थेट सरपंच म्हणून निवडून आलेल्या आयी ग्रामपंचायत सरपंच प्रार्थना मुरगुडी यांच्या विरोधात पहिला अविश्वास ठराव मंजुर झाला होता. तर सप्टेंबर महिन्यात मांगेली सरपंच सुर्यनारायण गवस यांच्यावर सदस्यांनी अविश्वास ठराव आणला होता हे ठराव सदस्यांनी मंजूर केले असले तरी सौ.मुरगुडी, व श्री.गवस हे थेट सरपंच निवडून आल्याने सदर प्रक्रियेसाठी ग्रामसभेचे मतदान आवश्यक होते. कोरोना काळात ग्रामसभा घेणे शक्य नसल्याने येत्या सोमवारी २३ नोव्हेंबर रोजी दोन्ही ठीकाणी सकाळी ११ वा. आयी व मांगेली येथे विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आलेले आहे. ग्रामसभेस उपस्थित प्रत्येकाने मास्क व सँनिटायझरचा वापर करणे अनिवार्य राहिल. तसेच सोशल डीस्ट्ंन्सीगचे पालन करणे अनिवार्य आहे. मात्र सदस्य मतदाना नंतरही आयोजित ग्रामसभेमुळे आयी, मांगेली सरपंचाचे भवितव्य ग्रामसभेत होणाऱ्या निर्णयावरच अवलंबून असल्याने या थेट सरपंच विरोधात जनता काय निर्णय देणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. सदस्यांनी नाकारले तरी मतदारांनी तारले असेही चित्र उद्याच्या ग्रामसभेत असल्याने आता मतदार यांचाही कस लागणार आहे.

ताज्या बातम्यांसाठी आमच्या Whatsapp ग्रुपवर ऍड होण्यासाठी येथे क्लिक करा.