‘ते’ वारकरी नसून संघाचे चमचे

0
312

पुणे : दि. २२ : महापूजेला विरोध करणारे वारकरी नसून संघाचे चमचे आहेत. वारकऱ्यांच्या नावाखाली पूजेला विरोध करणाऱ्या भाजपा कंपनीपासून वारकऱ्यांनी सावध रहावे अशी टीका राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी केली आहे. एक ट्विट करत त्यांनी भाजपावर टीका केली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते कार्तिकी एकादशीला श्री विठ्ठलाची महापूजा होणार आहे. या पूजेला विरोध करणारे वारकरी नसून संघाचे चमचे आहेत असं अमोल मिटकरी यांनी म्हटलं आहे. “तुका म्हणे खळ! करु समयी निर्मळ” असंही त्यांनी त्यांच्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

 

ताज्या बातम्यांसाठी आमच्या Whatsapp ग्रुपवर ऍड होण्यासाठी येथे क्लिक करा.