फणस खाल्याने आरोग्यासाठी होणारे फायदे जाणून घ्या..

0
1002

आपलं कोकण म्हणजे, आंबा आणि फणसाच्या बागाच बागा! फणस सर्वानाच खायायला आवडतो. फणसात बाहेरून काटे तर आत मात्र गोड-गोड गरे असतात. फणस हा खण्यास जसा गोड असतो तसाच तो आरोग्यासाठीही खूपच फायदेशीर असतो. फणस खाल्याने आरोग्यासाठी होणारे फायदे याविषयी माहिती खाली दिली आहे.

फणस खाण्याचे हे आहेत फायदे –
• फणसात व्हिटॅमिन-A, व्हिटॅमिन-B6 व व्हिटॅमिन-C भरपूर प्रमाणात असते.
• फणसातील उपयुक्त अँटीऑक्सिडंट्समुळे कँसर, मधुमेह, हृदयविकार व डोळ्यांचे आजार होण्यापासून रक्षण होते.
• फणसात असणाऱ्या व्हिटॅमिन-C मुळे इम्युनिटी वाढून व्हायरल इन्फेक्शनपासून दूर राहण्यास मदत होते.
• फणसात मुबलक असणाऱ्या तंतुमय पदार्थांमुळे पोट नियमित साफ होण्यासाठी मदत होते.
• फणसाचा Glycemic इंडेक्स (GI) कमी असतो. त्यामुळे फणस गोड असूनही रक्तातील साखर कंट्रोलमध्ये ठेवत असल्याने डायबेटीसमध्ये उपयुक्त असतो.
• फणसातील फायबर्स, पोटॅशियम व अँटीऑक्सिडंट्समुळे ब्लडप्रेशर नियंत्रित होते. त्यामुळे हाय बीपी, हृदयविकार कमी होण्यास मदत होते.
• फणसात लोहसुद्धा भरपूर असल्याने हिमोग्लोबिन वाढून ऍनिमिया दूर होते.
• फणसात कॅल्शियमचे प्रमाणही जास्त असल्याने हाडांच्या आरोग्यासाठीही तो फायदेशीर ठरतो.

– डॉ. सतीश उपळकर
CEO, हेल्थ मराठी डॉट कॉम

ताज्या बातम्यांसाठी आमच्या Whatsapp ग्रुपवर ऍड होण्यासाठी येथे क्लिक करा.