जिद्दीला सलाम…; शहीद मेजर कौस्तुभ राणे यांच्या पत्नी झाल्या लेफ्टनंट…!

0
560

मुंबई : दि. 22 : दहशतवाद्यांशी लढताना आपल्या प्राणाची आहुती देणाऱ्या महाराष्ट्रपुत्र मेजर कौस्तुभ राणे यांच्या पत्नी कनिका राणे या आता ‘लेफ्टनंट’ झाल्या आहेत. चैन्नईच्या अधिकारी प्रशिक्षण अकादमी (ओटीए) मध्ये त्यांनी ९ महिन्यांचे खडतर प्रशिक्षण घेतले असून त्यांना लेफ्टनंट पदांचे दोन ‘स्टार्स’ देण्यात आले आहे.

ऑगस्ट २०१८ मध्ये जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांशी लढताना महाराष्ट्राच्या मेजर राणे यांना वीरमरण आलं होतं. ते मीरा रोड इथे राहत होते. भारतीय सैन्याच्या ३६ रायफल बटालियनमध्ये ते मेजर म्हणून कार्यरत होते. ७ ऑगस्ट २०१८ रोजी सकाळी दहशतवाद्यांशी लढताना या भूमिपुत्राने देशासाठी बलिदान दिलं. कौस्तुभ राणे यांच्या पत्नी कनिका मुंबईत एका ठिकाणी खासगी नोकरी करत होत्या. पतीच्या निधनानंतर कनिका यांनी सैन्यात भरती होण्याचा निर्णय घेतला होता.

ताज्या बातम्यांसाठी आमच्या Whatsapp ग्रुपवर ऍड होण्यासाठी येथे क्लिक करा.